Wednesday, September 1, 2021

गोरेगाव येथे शिवसेनेची मोफत लसीकरण मोहीम.......!

गोरेगाव येथे शिवसेनेची मोफत लसीकरण मोहीम.......!

प्रतिनिधी - किशोर पाटील

मुंबई:- युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून शिवसेना नेते खासदार  गजानन किर्तीकर यांच्या मार्फत शिवसेना गोरेगाव विधानसभा विभागात आज दिनांक 30 ऑगस्ट सोमवार रोजी 4600 व 28 ऑगस्ट शनिवार रोजी आमदार उद्योग मंत्री सुभाष देसाई व खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या मार्फत 2100 अशा प्रकारे दोन दिवसात  गोरेगाव पूर्व  व पश्चिम शिवसेना शाखांच्या  प्रांगणात आमदार, विभाग प्रमुख सुनील प्रभू व युवा सेनेचे चिटणीस अमोल किर्तीकर यांच्या देखरेखी खाली विक्रमी लसीकरण मोहीम म्हणून एकूण  6700 नागरिकांना मोफत लस देण्यात आली,आणि नागरिकांना दिलासा दिला.त्या बद्दल नागरिकांनी सर्व शिवसेना नेत्यांचे आभार मानले. या मोहिमेत शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी महिला व पुरुष  तसेच युवा सेनेच्या व अंगीकृत संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली.अशी माहिती शाखा प्रमुख अजित भोगले यांनी दिली.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...