योगेश शंकर नम यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीच्या सचिव पदावर नियुक्ति ।
-------------------
पालघर(प्रतिनिधि):- अखिल भारतीय कॉंग्रेस च्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मान्यतेने राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी चे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सिफारिशी नंतर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीची नवीन कार्यकारिणी घोषित केली आहे ।
या कार्यकारिणी मध्ये पालघर जिल्यातून पालघर जिल्हा कॉंग्रेस कमीटी चे सरचिटणीस ,थाना जिल्हाचे माजी पालकमंत्री,माजी खासदार शंकर नम यांचे चिरंजीव योगेश नम यांना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या प्रदेश चिटणीस या पदावर नियुक्त केले आहे। त्यामुळे पालघर जिल्यातील कॉंग्रेसकार्यकर्त्यां मध्ये मोठे उत्साह संचारले असून योगेश नम यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। याच वेळी योगेश नम यांची पालघर जिल्ह्याचा जिल्हा नियोजन समिति (DCP) च्या सदस्य पदी देखील नियुक्ति महाराष्ट्र शासनाने केली आहे।त्यामुळे कॉंग्रेसजनां मध्ये प्रसन्नतेचा वातावरण असून कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्री. नम यांना शुभेच्छा दिल्या आहेत।
No comments:
Post a Comment