Wednesday, September 1, 2021

मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थांचे घवघवीत यश

*मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थांचे घवघवीत यश*
 नाशिक प्रतिनिधी / सतीश पाटील.

एकलहरे येथील मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रथम आणि द्वितीय वर्ष डी. फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी परिक्षेत खूप चांगल्या मार्कांनी पास होवून घवघवीत यश संपादन केले आहे. मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी चा निकाल दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी 100%  लागला आहे.  महाविद्यालयातील डी. फार्मसी च्या प्रथम वर्षात सर्वाधिक गुण संपादन करणाऱ्या पहिल्या तीन मध्ये प्रथम देवरे संकेत याने 88.27% तर द्वितीय क्रमांक बाविस्कर नरेश याने 87.09% तर तृतीय क्रमांक कापसे संदीप याला 86.00%  एवढे गुण मिळवले आहे . तसेच द्वितीय वर्ष डी.फार्मसी मध्ये प्रथम क्रमांक होले अतुल यास 90.00% तर द्वितीय क्रमांक  शिंदे अक्षदा 89.90% तर तृतीय क्रमांक सिरवी महेंद्र यास 89.60% गुण मिळवले आहे. महाविद्यालयाने विद्यार्थ्यासाठी सेमिनार आयोजित केले तसेच सुसज्ज ग्रंथालयाची उपलब्धता, लॅब मधील प्रात्यक्षिके आणि वेळोवेळी विद्यार्थ्याच्या टेस्ट सिरीज घेण्यात आल्या. विध्यार्थी आणि शिक्षकांच्या समन्वयमुळे मुलांची अभ्यासात अधिक रुची वाढली आणि विद्यार्थ्यांना अवघड विषय सोपे होऊन समजण्यात मदत झाली. पहिल्या तीन विद्यार्थांचे तसेच सर्व यशस्वी विद्यार्थांचे मातोश्री एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री.कुणाल दराडे यांनी विद्यार्थांचे आणि शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले. तसेच फार्मसी कॉलेज चे प्राचार्य डॉ. गोकुळ तळेले, विभाग प्रमुख प्रा. प्रशांत चव्हाण तसेच इतर शिक्षक वृंद यांनी देखील विद्यार्थांचे अभिनंदन केले. सर्व यशस्वी विद्यार्थांना परिश्रम पूर्वक अध्यापन करणाऱ्या मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी च्या शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...