Wednesday, September 29, 2021
ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द
Tuesday, September 28, 2021
आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन. अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांनी जपली सामाजिक बाधिलकी!
गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अतिमुसळधार पावसाची शक्यता
नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय
Monday, September 27, 2021
अंबरनाथमध्ये हॉटेल चालकाकडून दुसऱ्यांदा वीजचोरी; गुन्हा दाखल
कल्याण(प्रतिनिधी): दि. 27 सप्टेंबर 2021
महावितरणच्या पथकाने अंबरनाथ पश्चिमेतील नेताजी मार्केट परिसरातील नवाब हॉटेलमध्ये रिमोटच्या साह्याने सुरु असलेली वीजचोरी उघडकीस आणली आहे. विशेष म्हणजे वीजचोरी प्रकरणी या हॉटेलविरुद्ध 2017 मध्ये कारवाई करून चोरीच्या विजेचे 2 लाख 95 हजार 720 रुपयांचे वीजबिल व 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. आता नुकत्याच केलेल्या कारवाईत 25 हजार 350 रुपयांची 1202 युनिट वीज चोरून वापरल्या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
नवाब हॉटेलचा सध्याचा वीज वापरकर्ता अब्दुल शब्बीर बद्रुद्दीन व हॉटेलचा मालक सलीम शेख अशी याप्रकरणी वीज कायदा-2003 च्या कलम 135 व 138 नुसार गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नावे आहेत. हॉटेलच्या मीटरची तपासणी केली असता मीटरला तडा गेल्याचे निदर्शनास आले. संशयित मीटर जप्त करून तपासणी केली असता मीटरमध्ये रिमोट कंट्रोल सर्किट बसवल्याने आढळून आले. आरोपींकडून वीज चोरीसाठी वापरण्यात आलेला रिमोट कंट्रोलही जप्त करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये नवाब हॉटेलविरुद्ध वीजचोरीची कारवाई करून त्याच महिन्यात साडेतीन लाख रुपये वसूल करण्यात आले होते. महावितरणकडून ग्राहकांच्या वीज वापरावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून उपलब्ध माहितीच्या आधारे वीज चोरांवर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असून कोणतीही युक्ती वापरून विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी कल्याण परिमंडलातील ग्राहकांना केले आहे. सहायक अभियंता मनीषा मुऱ्हे, प्रकाश हरद, तंत्रज्ञ अजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सफाळे पोलीस ठाणे,जि. प. / पंचायत समिती पोट निवडणुकी साठी सज्ज.
दयानंद चोरघे यांच्या आदेशानुसार भिवंडी युवक कांग्रेस च्या वतीने रांजनोली रिलायन्स पेट्रोल पंम्प जवळआंदोलन!
लायन्स क्लब ऑफ ठाणे प्राईड* *यांच्या वतीने किशोर वयीन मुलींसाठी सॅनिटरी पॅड मशीन वितरण समारंभ
वृत्तपत्र वाटप करणार्या युवकाची गगन भरारी!प्रा.डॉ.नरेश बोडखे यांची कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया आर्थिक विभागाच्या संचालकपदी निवड
कृषी कायद्या विरोधात शेतक-यांच्या भारत बंदलाठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षदयानंद चोरघे यांचा जाहीर पाठिंबा!
Saturday, September 25, 2021
इंटरनॅशनल आयडॉल अॅवॉर्ड २०२१.
वाशी, नवी मुंबई येथील ‘मान्यवर’ शो रुम बाहेर हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !
भिवंडी ग्रामीणमध्ये काँग्रेसची बूथ बांधणी अभियानाला उत्साही प्रतिसाद
स्व.अंजली दिलीप सूर्यवंशी फाउंडेशन तर्फे महिला आरोग्य शिबीर
Friday, September 24, 2021
कल्याण परिमंडलातील 15 हजार ग्राहकांना वीजपुरवठा पूर्ववत करण्याची संधीराष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्याचे महावितरणचे आवाहन
कल्याण:(प्रतिनिधी) दि. 24 सप्टेंबर 2021
कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या 15 हजार ग्राहकांना त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करून घेण्याची संधी मिळत आहे. त्यासाठी या ग्राहकांना तालुकास्तरावर शनिवारी (25 सप्टेंबर) आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होऊन महावितरणच्या नियमानुसार मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेत थकबाकीची रक्कम भरावी लागणार आहे.
परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित 15 हजार ग्राहकांना राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्याबाबत विधी विभागाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. काही कारणांनी नोटिसा न मिळालेल्या ग्राहकांनाही अदालतीत सहभागी होता येईल. महावितरणच्या नियमानुसार अदालतीत सहभागी ग्राहकांना सवलत देण्यात येईल. या सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीची रक्कम भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यात येईल. तर ही संधी डावलणाऱ्या संबंधित ग्राहकांवर पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कायमस्वरूपी वीज खंडित ग्राहकांनी राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होऊन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंते, संबंधित अधिकारी, उपविधी अधिकारी दीपक जाधव राष्ट्रीय लोक अदालतीत उपस्थित राहणार आहेत.
सहायक अभियंत्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
कल्याण: (प्रतिनिधी)दि. 24 सप्टेंबर 2021
वीजपुरवठा खंडित का केला याचा जाब विचारत विरार ग्रामीण कक्ष कार्यालयात घुसून शाखा अभियंत्याला मारहाण केल्याची घटना गुरुवारी (23 सप्टेंबर) घडली. यासंदर्भात विरार ग्रामीण पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजित साळुंके, पूनम देसाई आणि एक अज्ञात व्यक्ती असे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आईचा अंत्यविधी व उत्तरक्रियेच्या रजेनंतर सहायक अभियंता राजकुमार कल्लोळकर गुरुवारी विरार ग्रामीण कक्ष कार्यालयात कर्तव्यावर रुजू झाले होते. दैनंदिन कामकाज सुरू असताना तिन्ही आरोपींची कार्यालयात घुसून वीजपुरवठा का खंडित केला याचा जाब विचारात शिवीगाळ सुरू केली. तर आरोपी अभिजित साळुंके याने कल्लोळकर यांना मारहाण केली. यात कल्लोळकर यांच्या नाकाला व कानाला जखमा झाल्या. कल्लोळकर यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा (कलम 353), जाणीवपूर्वक दुखापत करणे (कलम 323) संगनमत (कलम 34) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्तव्यावरील वीज कर्मचाऱ्यांना दमदाटी, मारहाण हा गंभीर स्वरूपाचा फौजदारी अपराध असून या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात अटकाव न करता सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
समवेत - जखमी सहायक अभियंता राजकुमार कल्लोळकर यांचे छायाचित्र
बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्या सहाय्याने कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न
Thursday, September 23, 2021
किशोर पाटील यांचा पत्रकार संघाच्या वतीने सन्मान!
आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन आणि तेरणा रिसर्च सेंटर हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन२१ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी तेरणा हॉस्पिटल मोफत बसणे पाठविले.
शिवसेनेला मिळत आहे तरूण तडफदार उमेदवार
केळवा ग्रामपंचायत हद्दीतील शितलाई मंदिर परिसरातील सर्व्हे.६० मधील अतिक्रमण केली दूर
Wednesday, September 22, 2021
आर एस पी कमांडर डॉ.मनिलाल शिंपी यांना आदर्श विद्यारत्न पुरस्कार २०२१ प्रदान !
अनोळखी मयत इसम तपास कामी.
दिवा आणि ठाणे दरम्यान ५व्या आणि ६व्या लाइनच्या संदर्भात रविवार दि. २६.९.२०२१ रोजी कळवा आणि मुंब्रा दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
Tuesday, September 21, 2021
तरूण पञकारांचे मार्गदर्शक किशोरजी बळीराम पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
प्रभाकर बाविस्कर यांनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला... समाजातील सच्चा समाजसेवक हरपला - मणिलाल शिंपी
राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त वाडा तालुक्यामध्ये जंतनाशक मोहिम संपन्न .
आगरी समाज व इतर समाज्याच्या आशीर्वादाने मराठी बिग बॉस सीजन - 3 मध्ये लोकप्रिय सुप्रसिद्ध गायक संतोष चौधरी उर्फ दादूसची धमाल.....!
Monday, September 20, 2021
वाडा तालुक्यात कायदेविषयक शिबिराचे आयोजन
मुंबई विद्यापीठ विभागीय कार्यालय येथे गेल्या 20 दिवसापासून सुरू असलेल्या कोरोनालसीकरण मोहीमेला मोठा प्रतिसाद!
Sunday, September 19, 2021
अमेठी ( उत्तर प्रदेश ) येथे झालेल्या २३ वर्षा आतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रातील कुस्तीगिरांनी २ सुवर्ण पदक , २ रोप्य पदक व ५ कास्य पदक पटकावून महाराष्ट्राचे वर्चस्व कायम ठेवले
Saturday, September 18, 2021
पत्रकार संघाचे उपक्रम दिशादर्शक.. डॉ.पै.तानाजी जाधवअहमदनगर
कोकण प्रादेशिक विभागात लघुदाब ग्राहकांकडे 3562 कोटी थकीतथकबाकी भरून सहकार्य करण्याचे सहव्यवस्थापकीय संचालक (प्र) श्री. प्रसाद रेशमे यांचे आवाहन
कोकण प्रादेशिक विभागात लघुदाब ग्राहकांकडे 3562 कोटी थकीत
थकबाकी भरून सहकार्य करण्याचे सहव्यवस्थापकीय संचालक (प्र) श्री. प्रसाद रेशमे यांचे आवाहन
कल्याण: (प्रतिनिधी)दि. 17 सप्टेंबर 2021
महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात सर्व वर्गवारीतील (कृषिपंप ग्राहक वगळून) 50 लाख 19 हजार लघुदाब ग्राहकांकडील वीजबिलाची थकबाकी 3 हजार 562 कोटी रुपयांवर पोहचली आहे. महावितरणची सध्याची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक (प्र) श्री. प्रसाद रेशमे यांनी केले आहे. तर वीजबिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहिम तीव्र करण्याचे निर्देश देतानाच या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
कोकण प्रादेशिक विभागात कल्याण, भांडुप, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडलांचा समावेश होतो. महावितरणच्या दरमहाच्या एकूण महसुलात जवळपास ४० टक्क्यांपेक्षा अधिक योगदान देणारा हा विभाग असून या विभागातील थकबाकीचा वाढता डोंगर महावितरणच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम करणारा ठरत आहे. परिणामी दैनंदिन खर्चासह, कर्मचाऱ्यांचे पगार, वीज खरेदीसारख्या अत्यावश्यक बाबींसाठी कर्ज काढण्याची वेळ महावितरणवर आली आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करून थकबाकी वसुलीच्या कामाला गती देत निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहव्यवस्थापकीय संचालक सातत्याने मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते ते थेट कार्यकारी अभियंत्यांपर्यंत संवाद साधत वसुलीचा आढावा घेऊन आवश्यक निर्देश देत आहेत. 500 रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणाऱ्या 20 लाख 71 हजार घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडून (2 हजार 909 कोटी रुपये थकबाकी) वसुली करावी अथवा त्यांचा वीजपुरवठा तातडीने खंडित करण्याचे आदेश सहव्यवस्थापकीय संचालकांनी दिले असून यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा निश्चित असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. तर विनंती व पाठपुरावा करून पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचे चालू वीजबिल वसूल करावेत. याशिवाय चालू वीजबिलाचा भरणा करणाऱ्या कृषीपंप ग्राहकांना थकबाकीत 66 टक्क्यांपर्यंत सवलत देणाऱ्या कृषिपंप धोरण 2020 योजनेचा लाभ देऊन थकबाकी वसुलीला चालना देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
कोकण प्रादेशिक विभागात लघुदाब वर्गवारीतील 43 लाख 24 हजार घरगुती ग्राहकांकडे 739 कोटी, 5 लाख 23 हजार व्यावसायिक ग्राहकांकडे 306 कोटी, 1 लाख 4 हजार औद्योगिक ग्राहकांकडे 372 कोटी, 23 हजार 649 पाणीपुरवठा योजनांकडे 498 कोटी तर 44 हजार 754 पथदिवे जोडण्यांचे 1 हजार 646 कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. भांडूप परिमंडलात 10 लाख 32 हजार 612 ग्राहकांकडे 537 कोटी, कल्याण परिमंडलात 13 लाख 3 हजार 718 ग्राहकांकडे 553 कोटी, कोकण (रत्नागिरी) परिमंडलात 4 लाख 62 हजार 695 ग्राहकांकडे 136 कोटी, नाशिक परिमंडलात 12 लाख 24 हजार 319 ग्राहकांकडे 995 कोटी आणि जळगाव परिमंडलात 9 लाख 96 हजार 172 ग्राहकांकडे 1 हजार 341 कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे.
----------------
Friday, September 17, 2021
वाढदिवस साजरा करायचा असेल तर कसा करावा हे उत्तम उदाहरण
Thursday, September 16, 2021
राष्ट्रवादीच्या महिला तोंड लाल करून मुका मार पण देतात.... स्वाती कांबळे.... राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडी शहर जिल्हा तर्फे प्रविण दरेकरचा जाहिर निषेध करण्यात आला
भिवंडी महापालिकेला लाजवेल असा काल्हेर ग्रामपंचायतीचा थाट... गणेश विसर्जन घाटावरील सोयी सुविधा मध्ये जिल्हाभर नाव लौकीक.
माटलवाडी युवा प्रतिष्ठाण तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप ..माटलवाडी युवा प्रतिष्ठाण कडून दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक साहित्य वाटप..
Wednesday, September 15, 2021
उल्हासनगरच्या तीन जीन्स कारखान्यांकडून साडेसात लाखांची वीजचोरीमीटरमध्ये फेरफार; गुन्हे दाखल
उल्हासनगरच्या तीन जीन्स कारखान्यांकडून साडेसात लाखांची वीजचोरी
मीटरमध्ये फेरफार; गुन्हे दाखल
कल्याण(प्रतिनिधी): 15 सप्टेंबर 2021
उल्हासनगर उपविभाग पाच अंतर्गत तीन जीन्स कारखान्यांची लबाडी महावितरणच्या कारवाईत उघडकीस आली आहे. वीज मीटरमध्ये फेरफार करून या कारखान्यांनी साडेसात लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. महावितरणने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित जागा मालक व विजेचा चोरटा वापर करणाऱ्यांविरूद्ध अंबरनाथ पोलिस ठाण्यात वीजचोरीचे तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. वीज चोरीसाठी मीटरच्या मागच्या बाजूस छिद्र करून वीज मापनाची वायर तोडण्याची सहज लक्षात न येणारी युक्ती या चोरटयांनी वापरली होती. परंतु संबंधित कारखान्यांच्या वीज वापर माहितीच्या विश्लेषणातून (डाटा अनालिसिस) ही चोरी उघडकीस आली.
जागा मालक अर्जुन रामपाल चौरसिया आणि वीज वापरकर्ता लवकुशकुमार धर्मराज कुशवाह (57/1, ‘शॉप 4 वराक 1968, उल्हासनगर, 05) यांच्या कारखान्यात मीटरशी छेडछाड करून वीज चोरी सुरू असल्याचे आढळले. मीटरची गती 31.56 टक्के कमी करून या कारखान्याने एक लाख 34 हजार 280 रुपयांची 9 हजार 601 युनिट वीज चोरून वापरल्याचे आढळून आले. दुसरे ग्राहक रमेश मोतीराम लालवाणी व त्यांचे प्रतिनिधी हरेश शबल्दास कृष्णानी तसेच वीज वापरकर्ते विजय भिक्कुवाढेल यानी ओटी सेक्शन येथील त्यांच्या कारखान्याच्या मीटरमध्ये फेरफार करून 5 लाख 83 हजार 320 रुपयांची 43 हजार 721 युनिट वीज चोरुन वापरल्याचे निष्पन्न झाले. तर तिसऱ्या प्रकरणात अयुब नवाब खान याने त्याच्या गायकवाड पाडा येथील कारखान्याच्या मीटरशी छेडछाड करून 2 हजार 228 युनिट (31 हजार 350 रुपये) विजेची चोरी केल्याचे आढळून आले. तिन्ही कारखान्यात मीटरच्या संच मांडणीत फेरफार करून विजेच्या वापराची नोंद कमी करून महावितरणचे नुकसान करण्यात आले. सहायक अभियंता रोहिदास बरंडवाल यांच्या फिर्यादीनुसार सर्व संबंधितांवर वीज कायदा- 2003 च्या कलम 135 नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मुख्य अभियंता श्री. धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय यादव, सहायक अभियंता बरंडवाल, कनिष्ठ अभियंता योगेश आटे, प्रधान तंत्रज्ञ निलकंठ राईचुरकर, जनमित्र प्रवीण आघळते, सुरेश गायकवाड, सहायक लेखापाल नीता ईसी, वरिष्ठ लिपिक सचिन माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
थकबाकी, वीजखरेदी खर्च आणि वीजहानी कमी करणे हीच त्रिसुत्री- श्री. विजय सिंघल
थकबाकी, वीजखरेदी खर्च आणि वीजहानी कमी करणे हीच त्रिसुत्री
- श्री. विजय सिंघल
मुंबई, (प्रतिनिधी)दि. 15 सप्टेंबर 2021:-
ग्राहकांकडे वीज बिलांपोटी असलेली थकबाकी, वीजखरेदी खर्च आणि वीजहानी याचे प्रमाण कमी करणे हीच आपली त्रिसुत्री आहे, यासाठी आपण सर्वांनी काम करायचे असून आपले सहकार्य अपेक्षित असल्याचे प्रतिपादन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी आज व्यक्त केले.
महावितरणच्या प्रकाशगड येथील मुख्यालयात भारतरत्न मोक्षगुंडम विश्वैश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभियंता दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे, संचालक (प्रकल्प) श्री. भालचंद्र खंडाईत, संचालक (वित्त) श्री. रवींद्र सावंत आणि संचालक (वाणिज्य) श्री. सतिश चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री.विजय सिंघल पुढे म्हणाले की, भारतरत्न मोक्षगुंडम विश्वैश्वरैया यांचे विचार परिघापलीकडील होते, अभियंता देश घडवित असतो, राष्ट्रनिर्मिती करतो. त्याचे विचार इतरांपेक्षा वेगळे असतात, त्यांच्यात वेगळी क्षमता असते. जगात जे कुणी करु शकत नाही, ते अभियंता करु शकतो. अभियंता म्हणून आपल्यात असलेल्या पूर्ण क्षमतेने आपण काम करायला हवे, केवळ दैनंदिन काम नव्हेतर त्याचसोबत काही वेगळे काम करणे म्हणजे अभियंता होय. याशिवाय आपल्याला कामाचे समाधान मिळविता येणार नाही. महावितरण ही माझी स्वत:ची कंपनी आहे, म्हणून सतत कार्यरत रहाण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आज महावितरणपुढे अनेक समस्या आहेत. मात्र अजुनही वेळ गेलेली नाही. आपली परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीने काम करावे लागणार आहे. मागिल वर्षीच्या तुलनेत यावर्षी वसुलीमध्ये चांगली कामगिरी झाली आहे. यात अनेक अडचणी आल्यात आणि काम करणा-या माणसाला अडचणी येणारच हा विचार करुन आपले नेहमीचे कार्य करत रहा. आपल्या सेवांचा दर्जा वाढवायला हवा, ग्राहक राजा आहे, असे समजून स्वत:साठी व कंपनीसाठी आपल्याला काम करायचे आहे, असे आवाहन श्री. विजय सिंघल यांनी केले.या कार्यक्रमाला महावितरणचे सर्व वरिष्ठ अधिकारी व अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.