Monday, September 20, 2021

वाडा तालुक्यात कायदेविषयक शिबिराचे आयोजन

*वाडा तालुक्यात कायदेविषयक शिबिराचे आयोजन*

(वाडा प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुबंई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या निर्देशांनुसार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त ग्रामीण भागामध्ये कायदेविषयक जनजागृती होण्याकरिता ग्रुप ग्रामपंचायत सरस ओहळ विल्कोस शीळ व प्राथमिक शाळा गोऱ्हे येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले व सर्व सामान्य नागरिकांना कायदेविषयक तरतुदीची माहिती होण्यासाठी व शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण काम करत असते या कामाचा भाग म्हणून लोकांमध्ये कायदेविषयक जनजागृती होण्याकरिता ग्रामीण भागात कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात प्रामुख्याने जेष्ठ विधिज्ञ् श्री सी पी पाटील यांनी जेष्ठ नागरिक कायदा विधिज्ञ् श्री दिलीप पष्टे यांनी कुळ कायदा श्री धनंजय पष्टे व विधिज्ञ् श्री खिलारे यांनी जामीन तरतुदी व न्यायालीन बंदीचे अधीकार अशा विषयावर मार्गदर्शन केले तसेच श्री एम डी सैदाणे तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर वाडा यांनी मोफत कायदेविषयक साहाय्य व विधिसेवा प्राधिकरणाची भूमिका या विषयी मार्गदर्शन करून दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे मध्यस्थी व लोक अदालत या वैक्लिपक वाद निवारण माध्यमामार्फत मिटवण्या बाबत ग्रामस्थांना आवाहन केले सदर कार्यक्रमाच्या वेळी वाडा तालुका वकील संघांचे विधिज्ञ् श्री सचिन पाटील श्री रणधीर खिलारे श्री अविनाश साळवे व सुधीर पाटील वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री दिलीप पवार व स्टाफ ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामसेवक श्री डी आर जोशी वरिष्ठ लिपिक तालुका विधी सेवा समिती वाडा श्री पुणेकर कनिष्ठ लिपिक श्री केवारी शिपाई इत्यादी हजर होते

No comments:

Post a Comment