Friday, September 24, 2021

बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्या सहाय्याने कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न



*बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्या सहाय्याने कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न*


  पालघर (प्रतिनिधी) जिल्ह्यात धडक मोहीम राबवल्यांतर  कुपोषणा मध्ये काही प्रमाणात  वाढ झाली असून सर्व उपाययोजना करूनही जिल्ह्यातील कुपोषण कमी होत नसून  अनुभवी बालरोगतज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ  यांच्या सहकार्याने कुपोषण कमी करण्यासाठी मदत होईल या हेतूने मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयातील व्ही.सी. दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. 
मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आरोग्य आणि महिला व बालविकास विभागामार्फत आपण कुपोषण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात परंतु तरीही कुपोषणात घट होत नाही यावर काय करता येईल असे विचारले असता उपस्थित बालरोगत स्त्रीरोगतज्ञ यांनी आपापली मते व्यक्त केली.
 शेवग्याच्या शेंगांचा आहारात भरपूर वापर करावा तसेच पाल्यापासून बनवली जाणारी मोरिंगा पावडर देखील यासाठी उपयुक्त असते असे सुचवले.तर बालकांना व मातांना आपल्या समोर जेवण देऊन आहारात अंडे,केळे, खिचडी यांचा समावेश असावा तर रोज दोन अंडी खाल्यास  १००% कुपोषण दूर होऊ शकते अस सांगितले.
सुके मासे, ऍनिमल प्रोटीन,आयर्न युक्त मीठ, शेंगदाणा तेल, याचाही आहारात समावेश करणे गरजेचे आहे असे सुचवले.
 तर बालकाचे कुपोषण कमी करायचे असेल तर केवळ बालके नाही तर पूर्ण कुटुंबे आणि गाव दत्तक घ्यावे लागेल.आणि आईच्या कुपोषणाकडे लक्ष दिले तर सुदृढ बाळ जन्माला येईल. असे मत ही यावेळी व्यक्त केले.होमिओपॅथी औषधांचाही  प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोग करता येईल. 
यासोबत च  बालविवाह,बालवयातील गरोदरपण, याबाबत जनजागृती करणे गरजेचे असून ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षण हे अत्यावश्यक आहे. असे अनेक कुपोषणा वर मात करणारे पर्याय यावेळी सुचवण्यात आले.
सर्व उपस्थित बालरोगतज्ज्ञ स्थानिक स्त्रीरोग तज्ञ व अधिकारी यांच्या सहकार्याने  कुपोषण कमी करण्यासाठी  योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी विचार विनिमय करण्यात येईल असे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म बा क),अति.जिल्हा शल्य चिकित्सक, इतर अधिकारी व बालरोगतज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment