Thursday, September 23, 2021

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन आणि तेरणा रिसर्च सेंटर हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन२१ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी तेरणा हॉस्पिटल मोफत बसणे पाठविले.

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन आणि तेरणा रिसर्च सेंटर हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
२१ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी तेरणा हॉस्पिटल मोफत बसणे पाठविले.
कल्याण दी.२३(किशोर पाटील)
आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन आणि तेरणा रिसर्च सेंटर हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन.अनंता सुधा भवन. शॉप नंबर 3. न्यू स्टार सिटी हॉस्पिटल खाली. चक्की नाका. कल्याण ( पूर्व )येथे मंगळवार दी.२१/०९/२०२१ रोजी करण्यात आले होते. यामध्ये
1) हृदयाची शस्त्रक्रिया.2) अन्ननलिका शस्त्रक्रिया 3) हाडांचे फॅक्चर शस्त्रक्रिया 4) कॅन्सर शस्त्रक्रिया  5) कान.नाक व घसा शस्त्रक्रिया  6) हर्निया  7) स्वशननलिकेच्या संबंधित शस्त्रक्रिया  8) पुरुष ग्रंथी  वाढणे मूत्राशयाच्या मार्ग संकुचित होणे 9) मणक्याची शस्त्रक्रिया  10) यकृत्याचे आजार / शस्त्रक्रिया 11) सांध्याच्या शस्त्रक्रिया  12) अपेन्डिस  13) डोळ्यातील सफेद पडद्याची शस्त्रक्रिया  14) मुतखडा शस्त्रक्रिया  15) जीभेच्या शस्त्रक्रिया  16) किडनीचे आजार  17) गर्भपिशवी दुरुस्ती  18) पित्ताशय किंवा पित्ताशयातील खडे शस्त्रक्रिया यांचा समावेश असून आज वेगवेगळ्या प्रकरतील एकूण २१ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी तेरणा हॉस्पिटल मध्ये घेऊन जात असल्याची माहिती डॉ.जितेंद्र पाटील यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना दिली. तसेच रूग्णांना आपली ओळख 
 पटऊन देण्यासाठी  येताना रेशन कार्ड. ओळखपत्र व  जुने रिपोर्ट सोबत घेऊन येणे असे सांगण्यात आले होते.त्यामुळे सर्व तपासण्या करताना कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. या शिबिरात एकूण 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये शस्त्रक्रियेसाठी 21 रुग्ण आढळले या रुग्णांना तेरणा रिसर्च सेंटर हॉस्पिटल नेरूळ नवी मुंबई या ठिकाणी ऍडमिट करण्यात आले आहे. 
 अशी माहिती श्री जितेंद्र पाटील आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन. अध्यक्ष यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना दिली.

No comments:

Post a Comment