Thursday, September 23, 2021

शिवसेनेला मिळत आहे तरूण तडफदार उमेदवार

शिवसेनेला मिळत आहे तरूण तडफदार उमेदवार 
 पालघर - पालघर जिल्हा परिषद वणई गटातून रोहित गावीत यांना उमेदवारी देण्यात आली, त्या बद्दल त्यांनी मा.श्री उध्दवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, श्री एकनाथजी शिंदे - नगरविकास मंत्री, श्री दादाजी भुसे कृषी मंत्री व पालघर जिल्हा पालकमंत्री, श्री रविंद्र फाटक संपर्क प्रमुख, मा. श्री राजेंद्र गावित खासदार पालघर जिल्हा, पालघर शिवसेना जिल्हा प्रमुख - महिला जिल्हा संघटक - जिल्हा युवा अधिकारी - तालुका प्रमुख - सर्व शाखा प्रमुख आजी माजी पदाधिकारी - शिवसैनिक यांचे ते मनापासून ( मान्यवर यांचे ) आभार / धन्यवाद .
    रोहित गावित हे प्रसिद्धी पासून दुर राहुन सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक कामे करीत आहेत. आजही हिंदूहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर मा. आनंद दिघे यांच्या शिकवणी प्रमाणे तळागाळातील जनते पर्यंत जाऊन ८० टक्के समाजकारण करण्यासाठी ते निवडणूक रिंगणात उतरत आहे. 
     सर्वसामान्य जनतेच्या प्राथमिक गरजा, शिक्षण व काळाबरोबर शिक्षणासाठी संगणकीय शिक्षण, आरोग्यासाठी  विविध योजना, औद्योगिक क्षेत्रात  कुशल कौशल्य युक्त रोजगार, शेतीला पुरक व्यवसाय उपलब्ध करणे, शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करणे, दळणवळणाची साधने उपलब्ध करणे, जि. परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ सर्व सामान्य नागरिक / शेतकरी यांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी मी प्रयत्न शिल असेल त्यांचे सांगणे आहे. 
  मा.श्री, राजेंद्र गावित साहेब खासदार पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली मी जनसेवेचे व्रत स्विकारले असून, मी जे बोलतो तेच मी करतो. असे रोहित गावित यांचे सांगणे आहे. ते  जिल्हा परिषद पालघर ( पोट निवडणूक ) वणई ( १८ ) गटाचे उमेदवार असून, त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण

No comments:

Post a Comment