Wednesday, September 22, 2021

आर एस पी कमांडर डॉ.मनिलाल शिंपी यांना आदर्श विद्यारत्न पुरस्कार २०२१ प्रदान !

🔴आर एस पी कमांडर डॉ.मनिलाल शिंपी यांना आदर्श विद्यारत्न पुरस्कार २०२१ प्रदान !🔴
       
कल्याण दि.22 (किशोर पाटील.) आदर्श शैक्षणिक समूह,संचालित ,श्री बापुसाहेब डी.डी.विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल नवी मुंबई व तरुण भारत  यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा आदर्श  विद्यारत्न पुरस्कार २०२१ (कर्तुत्वाला कौतुकाची थाप) हा आज बुधवार दी.२२ संप्तेंबर २०२१ रोजी  मा.श्री.डॉ.विष्णु मगरे (कुलगुरू प्रवरा इन्सिस्टुड ऑफ मेडिकल  सायन्स अभिमत विद्यापीठ लोणी अहमदनगर) व मा.श्री.विजय भाऊ चौधरी (भाजपा जिल्हाध्यक्ष नंदुरबार) यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र राज्य आर एस पी अधिकारी युनिट चे पितामह महासमादेशक अरविंद देशमुख या मान्यवरांच्या उपस्थितीत वर्चुअल पद्धतीने गौरवण्यात आला. यावेळीआर.एस.पी.कमांडर.श्री.डॉ.मनिलाल रतिलाल  शिंपी यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.त्यामुळे डॉ.मनिलाल रतीलाल शिंपी यांना त्यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या कार्याबद्दल हा पुरस्कार दिला गेला असे म्हणायला वावगे ठरू नये.म्हणून त्यांचे दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...सदरचा संपूर्ण कार्यक्रम  व पुरस्कार वितरण सोहळा ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.धनराजजी विसपुते (चेअरमन),श्री.महेंद्रजी विसपुते(अध्यक्ष)सौ.संगिता विसपुते(संचालिका)डॉ.सीमा कांबळे
प्राचार्या, 
श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल यांनी विशेष मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment