*स्व.अंजली दिलीप सूर्यवंशी फाउंडेशन तर्फे महिला आरोग्य शिबीर*
ग्रामीण प्रतिनिधी..
दुसखेडा येथे स्व.अंजली दिलीप सूर्यवंशी फाउंडेशन संचलित गीतांजली आरोग्यम हॉस्पिटल येथे महिला आरोग्य शिबीर घेण्यात आले.डॉ.विक्रांत सोनार (एम.बी.एस. एम.डी )स्त्री रोग तज्ञ आणि वाकचौरे वन नरसिंग चे विद्यार्थी यांच्या सहकार्याने तापी परिसरातील 90 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यात मुख्य:त महिलांच्या पाळी संदर्भात समस्या, पांढरे पाणी जाणे,पोटात दुखणे, कमी रक्तस्राव जास्त रक्तस्त्राव किंवा वारंवार रक्तस्त्राव, पाळीच्या सर्व समस्या, अंडाशयाच्या किंवा गर्भाशयाच्या गाठी वर औषध उपचार, वारंवार गर्भपात होणाऱ्या जोडप्यांचे समुपदेशन व औषधोपचार, वंधत्व निवारण व कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, प्रसुतीपूर्व व पश्चात औषधोपचार, अति जोखमीचे डिलेवरी व सिझेरियन ऑपरेशन, वयात होणाऱ्या मुलींच्या समस्या / समुपदेशन व औषध उपचार व समुपदेशन तपासणी करून मार्गदर्शन केले. त्या वेळेस सेवानिवृत्त पोलीस अधिकारी *दिलीपजी सूर्यवंशी साहेब* यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी संस्थेचे कार्य बद्दल माहिती दिली. सूर्यकांत सूर्यवंशी, संदीप कोळी, अरुण सूर्यवंशी, पिंटू राजपूत उपस्थित होते.शिबीर यशस्वी होण्यासाठी *विशाल दांडगे महाराष्ट्र प्रदेश सचिव ग्राहक संरक्षण फाउंडेशन* यांनी मोलाचे सहकार्य केले.
No comments:
Post a Comment