Wednesday, September 15, 2021

ओबीसींचे आरक्षण लागू होत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका - ओबीसी नेते हरिश्चंद्र भोईर

ओबीसींचे आरक्षण लागू होत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका - ओबीसी नेते हरिश्चंद्र भोईर 

भिवंडी दि.१५ ( किशोर पाटील )
ओबीसी राजकीय मुद्दा प्रलंबित असतांना सहा जिल्ह्यात होणा-या निवडणुका पुढे घेण्यासंदर्भात तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.धुळे,नंदुरबार,अकोला,वाशिम, पालघर व नागपूर येथील निवडणूका शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झालेल्या आहेत. जर या आघाडी सरकारने वेळीच इंम्पेरिकल डाटा कोर्टाला दिला असता तर आज ओबीसी बांधवांना निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती पण   आघाडी सरकारला ओबीसींचे आरक्षण जाणून बुजून काढून घ्यायचे होते म्हणून त्यांनी कोर्टाला इंम्पेरिकल डाटा दिला नाही त्यामुळे ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले म्हणजे या सरकारने मागासवर्गीय आयोग नेमून सुद्धा कुठलीही कारवाई केलेली नाही फक्त आणि फक्त ओबीसी समाजाला आशेवर ठेवून पद्धतशीरपणे निवडणुकीतून बाजूला केले त्यामुळे जो पर्यंत राज्यात ओबीसी आरक्षण लागू होत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नये अशी मागणी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष हरिश्चंद्र भोईर यांनी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.यावेळी भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष जितेंद्र डाकी,ओबीसीचे पदाधिकारी बाळाराम कराळे,उपसभापती गजानन आसवारे,पं.स.गटनेते भानुदास पाटील,विष्णु भोईर इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment