केळवा ग्रामपंचायत हद्दीतील शितलाई मंदिर परिसरातील सर्व्हे.६० मधील अतिक्रमण केली दूर
पालघर (प्रतिनिधी) पालघर तालुक्यातील प्रसिद्ध केळवा बीच. सर्व्हे नंबर ६० मधील शीतलाई मंदिरा जवळील अतिक्रमण करून जवळ जवळ याठिकाणी ३५ वर्षांपासून केलेली अतिक्रमण आज दि.२३/९/२०२१ .रोजी सकाळी दहा वाजे पासून संध्याकाळी ५:३० वाजे पर्यंत तोडण्यात आली.ग्रामपंचायत तर्फे १९८५, साली १५/१० =१५०/चौरस फूट जागा देण्यात आली होती.ह्यात येथील दुकानदार (हॉटेल) ह्यांनी बरीच अतिक्रमण जागा केली होती.ह्यांना २० ऑग्सट रोजी नोटीस देण्यात आली होती . त्यावेळी पाऊस असल्यामुळे कारवाई करण्यात आली नाही.ती आज कारवाई करण्यात आली ह्यात ७ हॉटेल वर जास्तीचे अतिक्रमण काढण्यात आले.ह्या कारवाई साठी ग्रामपंचायत केळवा सरपंच भावना कीणी ,ग्रामसेवक दिनकर मोढवे,उपसरपंच नितीन राऊत, माजी उपसरपंच व सदस्य तुषार पाटील, व सदस्य, पंचायत समिती.सदस्य भारती सावे,मंडलाधिकारी राजेश पाटील ,तलाठी अपेक्षा भोगटे तसेच केळवा पोलीस स्टेशनचे API भीमसेन गायकवाड, व PSI हरेश धनगर, तसेच पोलीस स्टाफ ह्यांच्या सह बंदोबस्त घेऊन. ग्रामपंचायतनी जे. सी. पी. च्या सहायाने अतिक्रमण तोडण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment