* राष्ट्रवादीच्या महिला तोंड लाल करून मुका मार पण देतात.... स्वाती कांबळे.... राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडी शहर जिल्हा तर्फे प्रविण दरेकरचा जाहिर निषेध करण्यात आला
भिवंडी दि.१६(किशोर पाटील)
प्रदेश अध्यक्षा आदरणीय रूपालीताई चाकणकर यांच्या आदेशाने भाजपा चे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर यांचा जाहिर निषेध आज गुरुवार दि. १६/९/२०२१ रोजी भिवंडी शहर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने करण्यात आला. *प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे. अशी अतिशय खालच्या दर्जाची टीका केलीली आहे प्रवीण दरेकरांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यात आला. जुना जकात नाका आनंद दिघे चौक येथे प्रवीण दरेकराच्या फोटोला लाली लिपस्टिक लावून चप्पल ने गाल लाल करून त्यांचा फोटो जाळण्यात आला तसेच प्रविणा मावशी ही उपाधी देऊन तसा बॅनर देखील बनविण्यात आला. प्रवीण दरेकर मुर्दाबाद, माफी मांगो अशी नारे बाजी करण्यात आली हा फक्त राष्ट‘वादी काॅंग्रेस पक्षातील पुरूष, पदाधिकारी कार्यकर्ते यांचाच अपमान नसून संपूर्ण महिलांचा सुद्धा अपमान आहे. स्त्री मातेसमान संस्कृती असण्या-या महाराष्ट्रामध्ये महिलांना मान/सन्मान* *सषक्तीकरणाचे धडे देणारा एकमेव राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष आहे प्रवीण दरेकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहिर निषेध करण्यासाठी महिला शहर अध्यक्ष स्वाती कांबळे, अलका गायकवाड, सुलभा जाधव, शमीम अन्सारी अफसाना खान, कांता जाधव, सुनीता राऊत, शबाना अन्सारी, सीतारून, अल्ताफ रंगरेज, सरवर अन्सारी मोठया संख्येने महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या*
No comments:
Post a Comment