अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जलतरण पट्टूचा सत्कार
भिवंडी दि.१४(स्व.रा.तो)
भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा जलतरण संघटने तर्फे जिल्ह्यातील जलतरण पट्टूचा सत्कार समारंभ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आला होता. शिवछत्रपती पुरस्कार विजेते शुभम वनमाली, अश्विनकुमार, नील शेकटकर, मंत्रा कुऱ्हे व श्रावणी जाधव यांचा स्विमिन्ग अससोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री दीपक मेजारी व उपाध्यक्ष श्री संतोष पाटील यांच्या उपस्थितीत विशेष सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला या सत्कार समारंभ कार्यक्रमास उमेश उत्तेकर किरण फाटक, राजेश गावडे संकेत सावंत, निमेश भोई रुपाली रेपाळे पंकज राठोड अंनिरुद्ध महाडिक शशिकांत काळे चंद्रशेखर निबरें स्वतेज कोळंबकर ,डॉक्टर तृप्ती कुऱ्हे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment