*जिल्हा परिषद पालघर आवारात अमृत महोत्सवी वर्ष भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*
पालघर (प्रतिनिधी) जिल्हा परिषद पालघर मार्फत 15 ऑगस्ट अमृत महोत्सवी वर्ष भारतीय स्वातंत्र दिन जिल्हा परिषद पालघरच्या प्रांगणात साजरा करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, वैदेही विशाल वाढाण यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद पालघर ज्ञानेश्वर सिताराम सांबरे , सभापती, बांधकाम व वित्त समिती, शीतल भुपेंद्र धोडी, सभापती, कृषी व पशुसंवर्धन, प्रतिभा जयवंत गुरोडा मुख्य कार्यकारी अधिकरी, जिल्हा परिषद पालघर, सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधिक्षक, दत्तात्रय शिंदे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, पालघर जिल्हयातील जिल्हा परिषद सदस्य, प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यं माणिक दिवे, व सर्व खाते प्रमुख तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
तत्पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या कार्यलयाच्या प्रांगणात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर सिताराम सांबरे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
सर्व जिल्हा परिषद शाळामध्ये, शासकिय कार्यालयामध्ये मोठया उत्साहात अमृत महोत्सवी वर्ष स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला.
No comments:
Post a Comment