Saturday, August 14, 2021

संजीवन म्हात्रे यांची अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन च्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती!

संजीवन म्हात्रे यांची अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन च्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती!
 ठाणे जिल्हा व भिवंडी तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव!

भिवंडी दि.१७(स्व.रा.तो)भिवंडी तालुक्यातील मौजे गुंदवली गावचे सुपुत्र तथा साई मेडिकल चे मालक  श्री.संजीवन केशव म्हात्रे (फार्मासिस्ट) यांची अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.दत्ता मारुती खराटे यांनी  सर्व पदाधिकाऱ्यांच्या अनुमतीने बिनविरोध अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन मुंबई विभागाच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती केलीआली आहे.
या निवडी मुळे भिवंडी तालुक्यातील एक फार्मासिस्ट मुंबई विभागाच्या उपाध्यक्ष पदी पोहचला म्हणून ठाणे जिल्हा व भिवंडी तालुक्यातून श्री.संजीवन केशव म्हात्रे (फार्मासिस्ट) यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून श्री.संजीवन म्हात्रे फार्मासिस्ट म्हणून  इमाने इतबारे काम करत आहेत व त्यांच्या कार्याची दखल अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन चे प्रदेशाध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी घेतली व त्यांना मुंबई विभागाची जबाबदारी दिली असल्याची माहिती त्यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना दिली.त्यांना दिग्गज वार्ताहर परिवार तर्फे  पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...