बेलपाडा - कांद्रेभुरे - सफाळे पश्चिम येथे जागतिक आदिवासी दिन संपन्न.
सफाळे ( हिरालाल लोखंडे )
आदिवासी संस्कृतीला जीवंत ठेवून, आदिवासींचे न्यायहक्क, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता जतन करण्यासाठी अविरतपणे, संघर्ष करणार्या आदिवासी बांधवांनी ९ आॅगस्ट २०२१ .जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने मौजे बेलपाडा - कांद्रेभुरे ग्रामपंचायत, सफाळे पश्चिम, ता,जि पालघर. येथे मान्यवर यांच्या उपस्थित. आदिवासी संस्कृती प्रमाणे निसर्ग पूजन करून, आद्य क्रांतीकारी, आदिवासी शूरवीर राजा, जनतेचा वाली मा.बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची वाजत गाजत पालखी मधून गावात मिरवणूक काढण्यात आलेली. यावेळी आदिवासी बांधव, पारंपारिक पध्दतीने नाचगाणी करीत असताना मिरवणूकीत सोबत असलेल्या प्रतिष्ठित व्यक्तीनाही आदिवासी नृत्य करण्याचा मोह आवरला नाही.
या प्रसंगी गावातील महिला, बालगोपाळ पारंपारिक वेशभूषा करून, नटून थटून आलेले. आपली पारंपारिक गाणी गात, नाचत आनंद घेत होते. श्री सागर सुतार ( वेढी ) सामजिक कार्यकर्ते व आदिवासी उन्नती संघाचे सक्रिय सभासद, श्री तुकाराम सुमडा पंचायत समिती सदस्य पालघर. श्री जगदीश पाटील सरपंच कांद्रेभुरे ग्रामपंचायत, सौ. अनिशा पाटील पोलिस पाटील कांद्रेभुरे ता,जि पालघर, श्री अरूण पाटील माजी सरपंच, सौ. तनुजा पाटील माजी सरपंच, सौ. ईच्छा पाटील ग्रा. प. सदस्य श्री मुरलीधर पाटील जेष्ठ नागरिक ,ग्रामपंचायत सदस्य आजी / माजी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री दिनेश गुडेकर सुनंदा चॅरिटेबल अॅन्ड एज्युकेशन ट्रस्ट पुरस्कृत अनुसया राजाराम सांगवेकर वाचनालय / कै. अनंत दाजी वझे वाचनालय यांचे अध्यक्ष यांनी सुत्रसंचलन करीत आदिवासी दिनांची माहिती सांगुन सर्विचे आभार मानीत कार्यक्रमांची सांगता केली.
No comments:
Post a Comment