*एक हात मदतीचा...*
*द सेंट्रल रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ वेलफेयर ट्रस्ट मुंबई...चा*
मुंबई (प्रतिनिधी) द सेंट्रल रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ ट्रस्ट वेल्फेअर ट्रस्ट मबई या ट्रस्ट ने सामाजिक बांधिलकी
आणि माणुसकीचे एक उत्तम उदाहरण पुन्हा एकदा प्रस्तुत केले..
महापुरामुळे उध्वस्त झालेल्या चिपळूण, खेड, महाड येथील
रहिवाशांना चटई, ब्लॅंकेट सहित जीवनावश्यक वस्तू ५० घरात पोचवले
आणि आपला समाज सेवेचा वसा कायम राखला...
या उपक्रमात ट्रस्ट चे हरिश्चंद्र मोंडकर, गिरीश कदम संजय आंग्रे, राजन सुर्वें, खाटपे ,व्ही. डी. पाटील, हरिष दहिलकर,प्रमोद मोरे, सी. व्ही. रासम, सुभाष रहाटे, गणेश रसाळ, प्रसाद करळकर, रवींद्र बिरवाटकर, जी. व्ही. भागवत यांनी प्रत्यक्ष पीडितांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि सामानाचे वाटप केले....
आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास दिला...
या समाजउपयोगी कामात मदत करणाऱ्या सर्व तिकीट चेकिंग स्टाफचे, तसेंच आमच्या सर्व हितचिंतकांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो...
No comments:
Post a Comment