Saturday, August 7, 2021

पंचायती राज राज्यमंत्री मा.ना.कपिल पाटील यांना २८ गावांच्या भिवंडी महानगरपालिकेत समावेश बाबतभूमिपुत्रांना न्याय मिळावा यासाठी दिले निवेदन !

पंचायती राज राज्यमंत्री मा.ना.कपिल पाटील यांना २८ गावांच्या भिवंडी 
महानगरपालिकेत समावेश बाबत
भूमिपुत्रांना न्याय मिळावा यासाठी दिले निवेदन !



भिवंडी दि.७(विनोद पाटील)ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र,भिवंडीचे लोकप्रिय खासदार मा.ना.श्री. कपिल पाटील यांची ठाणे जिल्ह्याचे पहिले केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतांना स्वराज्य तोरणचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सरचिटणीस श्री. किशोर बळीराम पाटील आणि समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष धर्मसेवक डॉ.श्री.सोन्या काशिनाथ पाटील 
यांची  दिल्ली येथील  
०५ नॉर्थ अव्हेनु डुप्लेक्स
मुघल गार्डन येथे भेट घेऊन हार्दिक अभिनंदन केले. 
 भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत ठाणे जिल्ह्यात कोणीही केंद्रीय मंत्री झाले नाही.पहिले केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री पदी खासदार मा.ना.कपिल पाटील यांची निवड भारताचे  पंतप्रधान आदरणीय  नरेंद्रजी मोदी यांनी करून ठाणे जिल्हा आणि आगरी समाजाला न्याय मिल ऊन दिला.यांचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान वाटणे स्वाभाविकच आहे .त्यामुळे  मंत्री महोदय साहेबांना भिवंडी महानगरपालिकेत २८ गावांचा समावेश करू नये म्हणून  समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य ,दैनिक स्वराज्य तोरण मित्र परिवार व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभागा च्या  वतीने निवेदन देण्यात आले. २८ गावांचा भिवंडी महानगरपालिकेत समावेश करण्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे भिवंडी तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्र पक्षभेद बाजूला ठेवून  वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत.रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.आपण केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री आहात.भिवंडी तालुक्यातील 28 गावांचा समावेश महानगरपालिकेत करू नये. यासाठी प्रयत्न आपल्या माध्यमातून झाले पाहिजे व  स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून द्यावा.अशी  विनंती  निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.तसेच 
21 ऑगस्ट 2021 रोजी दैनिक स्वराज्य तोरण चा 13  वां वर्धापन दिन आहे.  त्या अनुषंगाने स्वराज्य तोरण या वृत्तपत्राने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात नाव लौकिक करून समाजातील सर्व घटकांना समान हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न आपल्या लेखणीतून केला जात आहे म्हणून संपादक किशोर पाटील आपले जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.भविष्यातही आपल्या दैनिकामार्फत असेच लोकहिताचे कार्य चालू रहावे.सामान्य जनतेशी आपले नाते दृढ व्हावे.यासाठी आपणांस आणि दैनिक स्वराज्य तोरणच्या सर्व सहकार्यांना माझ्याकडून मनःपूर्वक  हार्दिक शुभेच्छा मा. ना.कपिल पाटील यांनी प्रत्यक्ष आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केल्या....

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...