पालघर (प्रतिनिधी)आजाद समाज पार्टी... पुरग्रस्तांच्या मदतीला
संविधान रक्षक, ASP, भीम आर्मी.. प्रमुख भाई चंद्रशेखर आझाद यांचा आदेश व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. राहुल प्रधान, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष (महिला आघाडी )मा. नेहाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आजाद समाज पार्टी (पालघर जिल्हा )कोकण पुरग्रस्त भागात दौरा व मदत कर्तव्य.
कोकणातील महाड हे ऐतिहासिक शहर व आजूबाजूची गावं अतिवृष्टीने पूर येऊन उध्वस्त झाली.. होतं नव्हतं सर्व वाहून गेलं.. सर्वांचे संसार उघडयावर पडले.. अशा परिस्थितीत अनेक पक्ष, संघटना, सामाजिक संस्था मदतीला धावून आल्या परंतु काही पुरग्रस्त भाग दुर्लक्षित राहिले तेथे मदत पोह्चलीच नाही.
महाड पासून 35-40 की. मी. लांब असलेली कडसरी लिंगना, वाघेरी, पाने वारंगी, वाघेरी आदिवासीवाडी या गावांना जोडणारा मुख्य रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेला.. बाजारपेठ संपर्क तुटला.. वीज गेली.. गावातील जीवनावश्यक वस्तू संपल्या.. उपासमारीची वेळ आली. ही परिस्थिती आजाद समाज पार्टीला समजताच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. अशोकदादा शिंगाडा, मा. राजन सोनावणे -जिल्हाध्यक्ष (श )मा. गणेश कलिंगडा -जिल्हाध्यक्ष (ग्रा. )मा. विजेंद ठाकूर युवा नेतृत्व यांनी या गावांना भेटी दिल्या. त्यांच्या सुख -दुःखाचा आढावा घेऊन त्यांना मदत कर्तव्य म्हणून धान्य, तांदूळ, बिस्कीट, जीवनावश्यक वस्तू दिल्या तसेच शासन -प्रशासन संपर्क करून रस्त्याच्या कामाचं व सुविधा विषयी चर्चा केली. गावकरी व प्रशासन यांनी स्वश्रमाने पर्यायी रस्ता बांधायला सुरवात केली आहे. धन्यवाद.. जय भीम.. जय आदिवासी..
No comments:
Post a Comment