Saturday, August 7, 2021

अवैधरीत्या रेती वाहतूक !टेंभिखोडावे टेम्पो पोलिसांच्या जाळ्यात

अवैधरीत्या रेती वाहतूक  !टेंभिखोडावे टेम्पो पोलिसांच्या जाळ्यात
 
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक ७ आॅगस्ट २०२१ रोजी केळवा सागरी पोलीस ठाणे ता,जि पालघर येथिल कार्यरत अधिकारी श्री भीमसेन गायकवाड साहेब व श्री जयदीप सांबरे, श्री संदीप खिल्लारे कर्मचारी रात्रीच्या गस्तीवर. आपल्या पोलीस ठाणे हद्दीतील टेंभिखोडावे येथे कार्यरत असताना, त्यांना पहाटे सुमारे ५ ते ५ - २० या वेळेत एक टेंपो ( पिक - अप एम. एच.४८  ए. जी.७२२५ )  टेंभिखोडावे येथे जाताना आढळून आला असताना, तपासले असताना, महाराष्ट्र शासनाने रेती उत्खनन व वाहतूक यावर बंदी असतानाही सदर पिक अप मालक व त्यांचे दोन साथीदार, यांनी स्वतःच्या फायद्यासाठी, महसूल विभागाचा कोणताही अधिकृत परवानगी त्याच्या जवळ नसताना आढळून आले. म्हणून केळवा सागरी पोलीस ठाणे ता,जि पालघर येथे गुन्हा रजि. नंबर ४० / २०२१ भारतीय दंड विधान कलम ३७९, ३४, जमीन महसूल अधिनियम ४८ ( ७ ) पर्यावरण संरक्षण १५ प्रमाणे  श्री संदिप खिल्लारे पोलीस काॅन्सटेबल यांनी गुन्हा दाखल केला आहे. 
   सदर गुन्ह्यातील टेंपो व १) प्रवीण बळीराम पाटील - चालक. वय वर्षे ३४ राहणार जलसार २ ) गोरख वामन गावड वय वर्षे ४२ राहणार  जलसार. ३ ) महेंद्र गजानन घरत राहणार जलसार यांना पोलिसांनी ताब्यात असून, वरिष्ठ अधिकारी पालघर यांच्या आदेशान्वये व श्री भीमसेन गायकवाड सा.पो.निरीक्षक साहेब केळवा सागरी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार श्री पाटील पुढील तपास करीत आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...