ग्रामपंचायत / जिल्हा परिषद शाळा - मौजे मायखोप ता,जि पालघर . ध्वजारोहण संपन्न
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) राष्ट्रीय सण १५ आॅगस्ट २०२१ या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्ण महोत्सवी मायखोप ग्रामपंचायत ता,जि पालघर येथील कार्यालयात. श्री अनिल बाबुराव पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष मौजे मायखोप ता,जि पालघर, यांच्या हस्ते ध्वजारोहण करून, राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली. तसेच जिल्हा परिषद शाळा मायखोप या ठिकाणी श्री प्रकाश सावर सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण करून, मानवंदना देण्यात आली.
ध्वज मानवंदना कार्यक्रमानंतर श्री अनिल पाटील यांनी सांगितले, आज देश प्रगती आणी विकासाच्या दिशेने वाटचाल करत, असताना करोना रूपी संकटाशी लढताना आपण सर्वीनिच करोना नियम पालन करणे जरूरीचे आहे. आणी आपण ते नियम पाळलेच पाहीजे. ग्रामपंचायत मायखोप हद्दीतील परिसरात व केळवा रोड ( स्टेशन ) परिसरात २ आॅक्टोंबर महात्मा गांधी जयंती निमित्ताने स्वच्छता मोहीम राबविण्याचा मानस व्यक्त केला. स्वातंत्र्य दिनाचा शुभ संदेश देत, आॅलम्पिक विजेत्या खेळाडूंचेही अभिनंदन केले. श्री प्रकाश सावर यांनी आपले मनोदय व्यक्त करताना, शालेय विध्यार्थी यांना शालेय उपयोगी वस्तू देण्याचे आश्वासन दिले असल्याचे समजून येत आहे.
सदर कार्यक्रम श्री रामदास पाटील शिवसेनेचे पदाधिकारी - सामाजिक कार्यकर्ते, श्री पांडूरंग पाटील - पोलीस पाटील मौजे मायखोप ता,जि पालघर. दत्ता भोईर / ममता किणी माजी ग्रा. पंचायत सदस्य, सौ. करूणा रामदास पाटील माजी सरपंच, दशरथ भोईर, संतोष भोईर, आजी माजी ग्रामपंचायत पदाधिकारी, विद्यार्थी, ग्रा. पंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, गावातील प्रतिसाष्ठित व्यक्ती उपस्थित होते.
No comments:
Post a Comment