सफाळे पोलिस ठाणेची यशस्वी कामगिरी,
चोरीस गेलेले ३४ अॅन्डाॅईड स्मार्ट मोबाईल फोन हस्तगत
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) सफाळे पुर्व स्टेशन विभागातील हरेश्वर पंडीत मार्केट मधील श्री संतोष कमलदेव जैन यांची मालकी असलेल्या सपना इलेक्ट्रॉनिक्स दुकानातुन चोरी झाली असल्याची फिर्याद ४ आॅगस्ट २०२१ रोजी त्यांनी दुकानातून त्याच्या संमतीशिवाय, लबाडीने व स्वतःच्या फायद्यासाठी, चोरीच्या उद्देशाने. त्याच दुकानात नोकरी करीत असलेला नोकर. कल्पेश गणेश पाटील वय वर्षे ३०, राहणार टेंभिखोडावे ता,जि पालघर. यांने मालकाच्या संमतीशिवाय फेब्रुवारी २०२१ ते ३ आॅगस्ट २०२१ या कालावधीत अंदाजे १,९९,०००/- रूपये किंमतीचे OPPO, VIVO, REALME, REDMI, कंपनीचे अॅन्डाॅईड स्मार्ट मोबाईल फोन चोरी केली. या बद्दल सफाळे पोलीस ठाणे, ता,जि पालघर. येथे गुन्हा रजि, नंबर ४९ / २०२१, भा.द.वि.सं. कलम ३८१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेली .
सदर गुन्ह्यातील आरोपी कल्पेश गणेश पाटील राहणार टेंभिखोडावे यास गुप्त बातमीदार, पाळत ठेवून. तांत्रिक विश्लेषण व कौशल्य पुर्ण तपास करून , सफाळे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री संदीप कहाळे सा.पोलीस निरीक्षक यांनी श्री दत्तात्रेय शिंदे पोलीस अधिक्षक पालघर, श्री प्रकाश गायकवाड अप्पर पोलीस अधिक्षक पालघर, यांच्या आदेशान्वये व श्री विकास नाईक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री पंकज पाटील पोलीस उपनिरीक्षक, श्री. महेश शर्मा पो. ह. श्री, के. बी. शेळके .पो. नाईक. श्री, आर आर घुगे पो. काॅन्सटेबल यांच्या सहकार्याने ४ आॅगस्ट २०२१ रोजी अटक करून मा. न्यायालय पालघर यांच्या कडुन आरोपी यास पोलीस कोठडी मिळाली असताना, घटना स्थळ व ईतर ठिकाणी तपासणी केली असताना आरोपीने OPPO, VIVO, REALML, REDMI कंपनीचे एकूण ३४ अॅन्डाॅईड स्मार्ट मोबाईल फोन चोरल्याचे कबूल केले. आरोपी कडून चोरीतील ५ , ००,५००/-रूपये किंमतीचे ३४ अॅन्डाॅईड स्मार्ट मोबाईल फोन हस्तगत करण्यात सफाळे पोलीस स्टेशन पथकाला यश मिळाले. तरीही पुढील तपास सूरू आहे.
सफाळे पोलीस ठाणे व्दारा चोरीच्या उद्देशाने केलेल्या गुन्ह्यांची तातडीने उकल ( तपास ) करून आरोपी यांच्या कडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल, सफाळे व्यापारी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक यांच्या कडून पोलीस स्टेशन अधिकारी, कर्मचारी यांचे शब्द सुमनाने अभिनंदन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment