Tuesday, August 17, 2021

पालघर जिल्हास्तरीय २३ आवश्यक कार्यालय लवकरात लवकर सुरू करावी !

पालघर जिल्हास्तरीय २३ आवश्यक कार्यालय लवकरात लवकर सुरू करावी !

श्री केदार काळे - शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक 

पालघर ( हिरालाल लोखंडे )
महाराष्ट्र राज्यतील ३६ वा जिल्हा म्हणून पालघर जिल्ह्याची निर्मिती १ आॅगस्ट २०१४ रोजी करण्यात आली. आज पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन  ( ७  ) सात वर्षाच्या कालावधीत, पालघर जिल्ह्याचे भव्यदिव्य ( कार्यालय ) संकुलन उभे राहिले आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील कामकाजासाठी चाळीस कार्यलये  सुरू होणार आहेत. 
   जिल्हास्तरावर आवश्यक असणारी २३ कार्यालयासाठी पदनिर्मिती, नेमणुका व ही कार्यालये लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी श्री केदार काळे शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक यांनी मा. श्री उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कडे ईमेल पाठवून करण्यात आली आहे. 
   १९ आॅगस्ट २०२१ रोजी मा. श्री उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य स्वतः पालघर मध्ये येऊन या प्रशासकीय संकुलनाचे लोकार्पण करणार आहे. संपूर्ण पालघर जिल्ह्यातील जनतेला आनंद झालेला आहे. आपण स्वतः मुख्यमंत्री साहेब संकुलनाचे लोकार्पण करत आहात, पालघर करांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसेच महोदय, आपण उर्वरित २३ कार्यालये लवकरात लवकर सुरू करावीत. या बद्दल या कार्यक्रम घोषणा करण्याची विनंती करीत आहोत. 
   महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अन्न व औषध प्रशासन, जिल्हा न्यायालय, कौटुंबिक तसेच औद्योगिक न्यायालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा अनेक विभागाचे जिल्हास्तरीय आस्थापने अजुनही सुरू झालेली नाहीत. त्यांची घोषणा आपण १९ आॅगस्ट रोजी करावी अशी विनंती आपल्या पत्रात करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...