Tuesday, August 17, 2021

पालघर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रावर सिकलसेल स्वयंसेवक नियुक्त करावे मा. श्री राजेंद्र गावीत खासदार पालघर

पालघर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रावर सिकलसेल स्वयंसेवक नियुक्त करावे 
मा. श्री राजेंद्र गावीत खासदार पालघर 
पालघर ( हिराला लोखंडे )पालघर जिल्ह्यात अंदाजे  ५४ स्वयंसेवक सन २००८ पासून ते सन २०२० पर्यत ( एकूण १२ वर्ष ) विविध आरोग्य विषयक सेवा योजनेत सातत्यपूर्ण पुढाकाराने सेवा देत आहेत. अश्या सर्व स्वयंसेवक यांना पालघर जिल्ह्यात एकूण ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी एक प्रमाणे नियुक्ती करावी. या साठी डॉक्टर भारती पवार - केंद्रीय राज्यमंत्री स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्री यांना लेखी निवेदन  दिनांक १७ आॅगस्ट २०२१ रोजी मा श्री राजेंद्र गावीत साहेब यांनी दिले. 
  सिकलसेल स्वयंसेवक मागील १२ वर्षा पासून सिकलसेल ग्रस्ताना रक्त पुरवठा, रक्त संक्रमण, आरोग्य अभिनय, संजय गांधी निराधार योजना, गरोदर माता, समुपदेशन, किशोरवयीन मुले - मुली यांची तपासणी, तसेच समुपदेशन ग्रस्त रूग्ण व वाहक यांचे मेळावे - औषधंउपचार इत्यादी आरोग्य विषयक अभियानात सक्रिय सहभाग देत असतात. 
   पालघर या आदिवासी जिल्ह्यात बालमाता संगोपन व कुपोषण सारखे आरोग्य विषयक अनेक प्रश्न असताना, त्याच बरोबर कोवीड १९ सारखी महामारीचे संकट ओढावले आहे. अश्या वेळी आरोग्य विषयक सेवा  ही अत्यंत निकडीची गरज आहे. त्याकरिता पालघर जिल्ह्यातील ४६ सिकलसेल स्वयंसेवक यांच्या १२ वर्षाचा आरोग्य विषयक सेवेचा अनुभव पाहता, जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथे, सिकलसेल सेवक म्हणून समायोजन करणे. या करीता आरोग्य विभाग पालघर  यांच्या प्रस्तावात नमुद केलेली " वार्षिक आर्थिक तरतूद " मंजून करण्या बाबतचे लेखी निवेदन मा. राजेंद्र गावित साहेब यांनी केंद्रीय राज्य मंत्री, भारती पवार यांच्या कडे दिले आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...