Tuesday, August 17, 2021

तृतीयपंथीय व तीन वाहक संचालकांमध्ये पैशाच्या कारणावरून फ्री-स्टाईल हाणामारी

तृतीयपंथीय व तीन वाहक संचालकांमध्ये पैशाच्या कारणावरून फ्री-स्टाईल हाणामारी

नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

नाशिक-सिन्नर महामार्गावर असणार्‍या शिंदे जवळ टोलनाक्यावर दुपारी तीनच्या सुमारास तृतीयपंथीय व तीन वाहक संचालकांमध्ये पैशाच्या कारणावरून फ्री-स्टाईल हाणामारी झाली यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती टोल प्रशासनाने तृतीयपंथी यांचा त्रास होत असल्याचे पत्र नाशिकरोड पोलिस स्टेशनला दिले असून पुढील कारवाई पोलिस करीत आहेत.
नाशिक सिन्नर टोल वेज लिमिटेड या शिंदे येथे असणाऱ्या टोल नाक्यावर पैसे मागण्याच्या कारणावरून तृतीयपंथीय आणि तीन वाहनचालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. या वेळी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
 यासंदर्भात नाशिक सिन्नर टोल वेज लिमिटेड या कंपनीने पोलिस प्रशासनाला पत्र देऊन किन्नर लोकांचा त्रास होत असल्याची तक्रार केली आहे. दरम्यान तीन वाहनचालक गाडी नाक्यावरच सोडून निघून गेल्याचे टोल व्यवस्थापनाने सांगितले  किन्नर वाहनचालकांकडून बळजबरी पैसे मागून त्यांना त्रास देतात शिवाय पैसे दिले नाही तर मारहाण करतात अशी तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास नाशिक रोड पोलिस करत आहेत.
आम्ही घटनेचे सी सी टी व्ही फुटेज पोलीस विभागाला दिले असून पत्राद्वारे किन्नर बांधवांचा जाच कमी करण्याची विनंती केली आहे. - नानक लूल्ला, टोल मॅनेजर

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...