Tuesday, August 17, 2021

पालघर जिल्ह्यात शेतकर्‍यांनी, आता शाश्वत शेतीकडे वाटचाल.... मा. श्री राजेश पाटील - आमदार बोईसर विधानसभा

पालघर जिल्ह्यात शेतकर्‍यांनी, आता शाश्वत शेतीकडे वाटचाल...... 
   मा. श्री राजेश पाटील - आमदार बोईसर विधानसभा 



विरार ( हिरालाल लोखंडे ) सध्याच्या परिस्थितीत शेती ही नेहमीच तोट्यात असते. ती फायदेशीर होऊच शकत नाही. असा गैरसमज किंवा अनुभव शेतकरी वर्गास वाटत असतो. तरीही शेतीकडे शेती हा एक व्यवसाय म्हणून बघणे, हि देखील काळाची गरज आहे. आजच्या परिस्थितीत करोनारुपी महामारी मुळे व करोनाच्या नियम पालनामुळे, जगणे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांना  आणि प्रामुख्याने तरूण युवा पिढीला शेती शिवाय पर्याय नाही, कळून चुकले आहे. 
   शाश्वत शेती कशा प्रकारे फायदेशीर आहे. या साठी मा. श्री  राजेश पाटील बोईसर विधानसभा  आमदार यांनी, पालघर व वसई तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी दिनांक १६ आॅगस्ट २०२१ रोजी जैन मंदिर हाॅल, शिरसाड मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (विरार हद्दीत ) ता. वसई जि. पालघर येथे कार्यशाळा घेऊन, कार्यशाळेत श्री सुकेश सिन्हा - सुगंधी औषध वनस्पती तज्ञ यांनी सर्व शेतकरी बांधवांना, सुगंधित वनस्पती लागवड बद्दल सविस्तर माहिती दिली तसेच प्रोसेसिंग व आर्थिक फायद्या बाबत सविस्तर माहिती सांगत पटवून दिले. श्री विनायक काशिद आंतरराष्ट्रीय कृषी अभ्यासक यांच्या नियोजना व्दारे व श्री राजेश पाटील आमदार बोईसर विधानसभा. श्री राजीव पाटील प्रथम महापौर वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. 
    कार्यशाळेत डाॅ. संजयजी देशमुख माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ, डाॅ. सिद्धीविनायक बर्वे   ठाणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेंचे अध्यक्ष, श्री राजेश पाटील / श्री  सुकेश सिन्हा सुगंधी औषधी वनस्पती तज्ञ. श्री विष्णू कडव माजी पालघर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती, यांची उपस्थिती व मार्गदर्शन मोलाचे होते. श्री विश्वनाथ घरत बहुजन विकास आघाडी पालघर जिल्हा उपाध्यक्ष, अॅड नितिन भोईर, जयश्री किणी माजी नगरसेविका, कविता किरकिरा माजी उपसभापती पंचायत समिती वसई, सुगंधा जाधव माजी पं. समिती सभापती, बसवत ताई माजी पं. समिती सदस्य, श्री अरूण पाटील माजी सरपंच शिवणसई, प्रकाश कासार माजी उपसरपंच भाताणे, किशोर किणी माजी सरपंच कोपर, श्री जिवन सांबरे माजी जि. परिषद सदस्य, सदानंद पाटील आदि. आजी माजी बहुजन विकास आघाडी चे पदाधिकारी, शेतकरी बांधव शेकडोच्या संखने उपस्थित होते. यामुळे भविष्यात शेतकरी खऱ्या अर्थाने सबल झाल्या शिवाय राहणार नाही.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...