कोकण पूरग्रस्तांसाठी शिवसेना शाखा नवघर पुर्व ता. वसई जि.पालघर व्दारा औषधांची मदत
वसई ( हिरालाल लोखंडे ) अतिवृष्टीमुळे कोकणात होत्याचे नव्हते झाले. प्रत्येक ठिकाणाहून फुल नव्हे फुलाची पाकळी म्हणून मदतीचे हात पुढे येत आहेत. पुराचे पाणी ओसरले तरी, आरोग्य साठी आवश्यक अश्या औषधे यांचा तुटवडा भासत असताना नवघर पुर्व शिवसेना शाखा मार्फत विविध औषधांचा साठा कोकण येथे पाठविण्यासाठी तयार करीत आहे यामध्ये ताप, सर्दी, खोकला,तसेच त्वचारोगावरील औषधे, विटामिन अ, ब, व क च्या टॅबलेट त्याच बरोबर सॅनिटायझर आदी मदत पाठविण्यात येणार आहे. या बाबत सोमवारी दिनांक १६ आॅगस्ट २०२१ रोजी श्री राजेंद्र गावित पालघर लोकसभा शिवसेना खासदार यांच्या उपस्थित मदत कार्याची पाहणी करण्यात आली.
यावेळी श्री विनायक निकम शिवसेना वसई विधानसभा संघटक, राजन पाटील माजी नगरसेवक, किरण चेंदवणकर माजी गट नेत्या, कमलाकर पाटील, शिवसेना महिला कार्यकर्त्यां, आजि माजी शिवसैनिक, महाराष्ट्र वाहतूक सेना, महिला आघाडी यांच्या सौजन्याने हि औषधे जमा करण्यात आलेली हि औषधे रूपी मदत मुंबई दादर येथील सेनाभवनात श्री सौरभ जोगळेकर यांच्या कडे सुपूर्त करण्यात येऊन नंतर ती मदत पूरग्रस्त नागरिकांन पर्यंत पोहचविण्यत येणार आहे
या पूर्वीही अन्नधान्य, कपडे गृहोपयोगी सामानाची मदत पाठविण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment