प्रा.आ.केंद्र दांडी येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
बोईसर (प्रतिनिधी) दि.१५ ऑगस्ट २०२१ रोजी प्रा.आ. केंद्र दांडी येथे ध्वजारोहन मा.प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश पांचाळ सर ह्यांचे हस्ते करण्यात आले .सदर प्रसंगी सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. तसेच यावेळी *तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ मुक्ती* याबद्दल मा. वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांना शपथ घेण्यात आली.या कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश पांचाळ यांच्यासह डॉ.आकांक्षा माने डॉ. वैष्णवी कळंबे तसेच आरोग्य सहायीका श्रीमती आर एस लाडे आरोग्य सहाय्यक श्री. प्रशांत गुर्जर आरोग्यसेविका गीता संखे मीनल वडे, अहिल्या मोरे, प्रतिभा जाधव, औषध निर्माण अधिकारी श्री पाडवी, महेश बारगा ,अनिल मोरे, निलेश मोरे, गटप्रवर्तक पौर्णिमा नेमाडे, रूपाली जिरगे, दिपाली पिंपळे व सर्व आशाताई तसेच शाळेतील शिक्षिका आणि विद्यार्थी, गावातील नागरिक उपस्थित होते व या सर्वांना आजच्या दिवशी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ मुक्ति करणे यासाठी डॉ. गणेश पांचाळ यांनी शपथ दिली व तसेच मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले
No comments:
Post a Comment