Sunday, August 15, 2021

उद्योग क्षेत्रातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसला पाहिजेत भारतीय जनता उद्योग पार्टी ने जिल्हाधिकारी यांना दिले पत्र

उद्योग क्षेत्रातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसला पाहिजेत भारतीय जनता उद्योग पार्टी ने जिल्हाधिकारी यांना दिले पत्र

पालघर (प्रतिनिधी) मागील अनेक वर्षांपासून कंपनी व्यवस्थापकाला गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडांकडून नेहमीच त्रास होत असतो .पण भीती पोटी तो तक्रार करण्यास घाबरत असतो .म्हणून भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी पालघर जिल्हाध्यक्ष  रमेश शेट्टी ह्याच्या मार्फत आत्ता तक्रार दाखल होणार.ह्याच महिन्यातील ८ ऑगस्ट २०२१ रोजी  औरंगाबाद येथील उद्योजक  "भोगले ऑटोमोटीव्ह" च्या ऑफिस मध्ये घुसून बेदम मारहाणीचा प्रकार झाला आहे .तसेच त्याच भागात १०. ऑगस्ट २०२१ रोजी "श्री गणेश कोटिंग" ह्या कंपनीत घुसून  शिवकुमार  राजेभोसले ह्यांना दहा ते पंधरा जणांनी बेदम मारहाण केली आहे.हे असेच होत राहिले तर उद्योजक आपला उद्योग बंद करतील.मग तेथील कामगारवर उपासमारीची वेळ येईल  ह्याला जबाबदार कोण .तरी अशा वाईट गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना लवकरात लवकर जेलबंद करा .तसेच काही भागात संघटना बनून संघटने मार्फत दादागिरी करीत असतात .आमच्या माणसांना घ्या .नाहीतर आम्हाला दर महिन्याला एवढी रक्कम द्या. आत्ता अशा कारोनाच्या कठीण काळात उद्योजकांनी काय करायचे ही त्यांची होणारी पिळवणूक थांबलीच पाहिजे ह्यासाठी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे पालघर जिल्हाध्यक्ष ह्यांनी पालघर जिल्हाधकाऱ्यांमार्फत मार्फत निवेदन देऊन अशा भ्याड प्रववृतीच्या लोकांनाचा निषेध व्यक्त केला आहे. व ह्या लोकांवर लवकरात लवकर कारवाई  व्हायला हवीत अशीच मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...