आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते पालघर तालुक्यातील सफाळे विभागात विविध कामांचे उद्घाटन व भूमिपूजन संपंन्न,,,,,
सफाळे (प्रतिनिधी) आज पालघर तालुक्यातील सफाळे विभागातील विलंगी येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.तसेच टेंभिखोडावे व मांडे येथील स्थानिक आमदार विकास कार्यक्रमांतर्गत आणि ग्रामविकास विभाग यांच्याकडून मंजूर केलेल्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच टेंभीखोडावे येथील आशा अनंत भोईर यांचे पुराच्या पाण्यामुळे राहते घर कोसळले होते त्यांना देखील रोख रक्कम स्वरूपात मदत करण्यात आली.यावेळी आयोजित विळंगी येथील कार्यक्रमात ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच आणि सर्व सदस्यांचे विशेष कौतुक करत त्यांनी गावात केलेल्या विकास कामांची स्तुती केली. तसेच यापुढे गावासाठी आपल्या फंडातून विशेष निधी देण्याचे आश्वासन दिले.आणि मांडे व विराथन येथील ग्रामस्थांच्या रस्त्या विषयी समस्या जाणून घेत आपण पुढील काही दिवसात सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे अधिकारी ,संबंधित रस्त्याचे ठेकेदार यांना सोबत घेऊन रस्त्याची पाहणी करून विभागातील नागरिकांच्या सर्व समस्यांचे निरासरण करणार असल्याचे आमदार महोदयांनी सांगितले.
यावेळी त्यांच्या समवेत बहुजन विकास आघाडीचे पालघर उपाध्यक्ष विश्वनाथ घरत,पालघर तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील, पी टी पाटील सर,तालुका संघटक मिलिंद साखरे,पालघर शहर उपाध्यक्ष डायमंड चड्डा, विळांगी सरपंच स्वाती पाटील ,उपसरपंच,टेंभिखोडवे सरपंच,उपसरपंच,ज्येष्ठ कार्यकर्ते गावड काका,ज्ञानेश्वर पाटील , विरथन सरपंच शरद घरत, युवा कार्यकर्ते कामनिष राऊत, योगेश घरत , अल्पेश भोईर , सुधीर माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment