Sunday, August 15, 2021

१५ आॅगस्ट, स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवी पूर्वसंध्येला, ७५ फळ झाडांची लागवड.

१५ आॅगस्ट, स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवी पूर्वसंध्येला, 
७५ फळ झाडांची लागवड. 

पालघर ( हिरालाल लोखंडे ) भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण झाली. या अमृत महोत्सवा निमित्ताने पालघर जिल्ह्यातील नवोदय विद्यालय यांच्या प्रांगणात ७५ /-  अक्षरी पंचाहत्तर फळ झाडांची लागवड करण्यात आली. 
    फिक्कट प्लो मुंबई  ( F I C C I Flo Mumbai ) या संस्थेच्या वतीने पर्यावरण जोपासण्यासाठी व भविष्यात या  प्रांगणात लावलेल्या या झाडांची फळे यांचा शाळेत शिकणार्‍या विद्यार्थीना आस्वाद मिळावा. झाडा पासून मिळणारी सावलीही सुखदायक असणार. अश्या बहुपयोगी झाडाचे संवर्धन व करणे महत्वाचे असल्या कारणांमुळे श्रीमती रुबिना शहापूरवाला - फिक्की प्लो मुंबई एन जी ओ चे चेअरमन, सौ उज्ज्वला काळे - पालघर नगराध्यक्षा, श्री केदार काळे - पालघर संस्कृतीक मित्र मंडळ अध्यक्ष, श्रीमती हेमलता मॅडम मुख्याध्यापिका नवोदित विद्यालय पालघर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 
   फिक्की प्लो मुंबई या एन जी ओ मार्फत ग्रामीण भागातील जनतेसाठी, व विषेशतः लहान मुलांसाठी डॉक्टर उज्ज्वला काळे / श्री केदार काळे यांच्या मार्फत अनेक कार्यक्रम राबविण्यात येतात. कार्यक्रमाला श्रीमती नाजनीज कात्रक मॅडम - मुश्तांग कंपनी, श्री एस एन सानब   सर व्हॉईस प्रिन्सिपल नवोदित विद्यालय, श्री बी एम चौधरी / बी एम देवरे शिक्षक गण. श्री शैलेश ठाकुर आदि मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...