Tuesday, August 17, 2021

ठाणे- पालघर जिल्ह्यातील तंझिम संघटनेची महाड- चिपळून परिसरातील पूरग्रस्तांना मदत!

ठाणे- पालघर जिल्ह्यातील तंझिम संघटनेची महाड- चिपळून परिसरातील पूरग्रस्तांना मदत!

 तारापूर (प्रतिनिधी)२२ जुलै २०२१ दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने  रायगड,रत्नागिरी जिल्ह्यातील महाड ,चिपळून परिसरातील बहुसंख्य गांवाना महापुरांचा फटका बसला असून अनेक गावांतील कुटूंब उध्वस्त होऊन जीवीत हानी ही मोठ्या प्रमाणात झाली आहे ,या महापुरात उध्वस्त झालेल्या लोकांना अनेक सेवा भावी संस्थानी मदतीचा हात दिला आहे, सर्वत्र मदतीचा ओघ वाढत असून ,ठाणे-पालघर जिल्हा ग्रामीण येथील मूस्लीम उत्कर्ष संघटना (तंझिम) या संघटनेने कोकणातील महापुरात नुकसान झालेल्या कुंटूंबियांना अन्नधान्य,कपडे ,औषधी व गरजू वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत, असे तंझिम संघटनेचे अध्यक्ष समीर डांगे यांनी एका लेखी पत्राद्वारे सांगीतले आहे.
महाड आणि चिपळून मधील मोहल्ले पुरग्रस्त झाले असून तंझिम संघटनेचे पदाधिकारी येथील पांसरे,खारखेड मोहल्ला ,मधारी नाका,कोंडवीते, राजवाडी,पेठमाप,मिठानगरी ,तरे मोहल्ला ,काशीगांव ,मेबल मोहल्ला ह्या ठिकाणी पुराचे पाणी उतरत असतांना त्यात अडकलेल्या लोकांना अन्न- धान्य, खाऊ , पिण्याचे पाणी उपलब्ध करून येथील चिखलमय परिसरातील लोकांना आरोग्याचे दृष्टिने मोबाईल व्हँनसह डॉक्टर व औषधी चे वाटप करण्यात आले.
तंझिम मदत कार्याचे, मुंबई जामा मजिदचे मुफ्ती अशफाक,अहमद काझी यांचे मार्फत चिपळून चे मौलाना इलियास,मौलाना सादिक  व नगर सेविका हमिदा शेखनाग यांनी कौतूक केले.
या कामात तंझिम चे सरचिटणीस ईस्माईल खान,शाहिद मुल्ला,तकी नाचन,शादाब पटेल, मोहसीन मुरूमकर,जुबेर बोटके, डॉ.इरफान पटेल यांनी मोलाचे सहकार्य केले .

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...