Tuesday, August 10, 2021

पालघर जिल्ह्यातील उद्योग धंद्यातील विविध समस्यांबाबत बविआ शिष्टमंडळाने दिल्ली येथे घेतली केंद्रीय मंत्री माननीय श्री. नारायण राणे साहेबांची भेट

*पालघर जिल्ह्यातील उद्योग धंद्यातील विविध समस्यांबाबत बविआ शिष्टमंडळाने दिल्ली येथे घेतली केंद्रीय मंत्री माननीय श्री. नारायण राणे साहेबांची भेट*

 पालघर (प्रतिनिधी): पालघर जिल्ह्यामध्ये विशेषतः वसई आणि पालघर तालुक्यामध्ये अनेक लहान मोठे उद्योजक व्यवसाय करत आहेत त्यावर मोठ्याप्रमाणात रोजगार अवलंबून आहे मात्र  विद्युत पुरवठ्याची  अनियमिता, आयात निर्यातीकरीता पालघर जिल्ह्यामध्ये सक्षम सुविधा उपलब्ध नसल्याने उद्योग व्यवसायावर विपरीत परीणाम होत आहे तसेच घातक कचरा व्यवस्थापन आणि विघटनाची सोय फक्त  तलोजा येथे असल्याने तसेच ते खर्चिक असल्याने ब-याच उद्योजकांकडून घातक कचरा पालघर जिल्ह्यामध्ये आजूबाजूच्या परिसरात टाकला जातो त्यामुळे बरेच प्रदुषण वाढले आहे. ह्या समस्यावर ठोस उपाय करण्यासाठी आज दिनांक 10/08/2021 रोजी लोकनेते आमदार श्री.  हितेंद्र विष्णू ठाकूर याच्या सूचनेनुसार बोईसर विधानसभेचे आमदार श्री राजेश रघुनाथ पाटील, माजी खासदार श्री. बळीराम जाधव, मा. जिल्हा परिषद ठाणे अध्यक्ष श्री. काशीनाथ  पाटील. मा. महापौर श्री. नारायण मानकर व अँड. नितीन भोईर यांच्या शिष्टमंडळाने सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग केंद्रीय मंत्री श्री.  नारायण राणे साहेब यांची भेट घेतली. दिलेल्या निवेदनावर मंत्री महोदयांनी सविस्तर चर्चा केली. तसेच उपरोक्त समस्यांबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश अधिका-यांना  दिले तसेच घातक कचरा विघटन व्यवस्थापन प्रकल्प टाकण्यासाठी एखादी  संस्था तयार असल्यास त्या संस्थेला आर्थिक सहाय्य  देण्याचे तसेच पालघर जिल्ह्यातील उद्योजकांच्या शिष्टमंडळाबरोबर दिल्ली येथे सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले 
यावेळी बविआ शिष्टमंडळाने मंत्रीमहोदयांचा  समस्त पालघर जिल्ह्यातील नागरीकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...