Wednesday, August 11, 2021

पालघर जिल्हा करोना नियमावलीच्या २ र्‍या स्तरावर आणावा . श्री केदार काळे - शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक

पालघर जिल्हा करोना नियमावलीच्या २ र्‍या स्तरावर आणावा .
   श्री केदार काळे - शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक 



पालघर ( हिरालाल लोखंडे ) पालघर जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असून, करीना रूग्णांची पाॅझिटिव्हिटी साधारणपणे  २.५ पेक्षा कमी असल्याचे समजत आहे. तर आॅक्सिजन बेड रूग्णांची संख्या अत्यंत आहे. 
   पालघर जिल्हा करोना लेव्हल तिनच्या वरील स्तरावर, निर्बंधांत असल्याने अत्यावश्यक वस्तूंची दुकाने. शासनाने परवानगी दिलेल्या दुपारी ४ पर्यंतच सुरू असतात. तिसर्‍या स्तरावरील अनेक निर्बंधांमुळे व्यापार, व्यवसाय करणे. तसेच रोजगार निर्मितीसाठी अडथळा येत आहे. यामुळे दैनंदिन व्यवहार, व्यापार रोजगार धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.या गोष्टींचा विचार करता श्री केदार काळे -  पालघर शिवसेना लोकसभा  सहसमन्वयक यांनी मा. श्री उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, श्री राजेश टोपे - आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य, श्री दादाजी भुसे - पालघर जिल्हा पालक मंत्री यांना, पालघर जिल्ह्याला करोनाच्या दुसर्‍या स्तरावरील ( लेव्हल ) निर्बंध लावावेत. या बदल लेखी स्वरूपात निवेदन दिले असून, जिल्ह्यात आॅक्सिजन बेड उपचार  घेणारी रूग्ण संख्याही कमी आहे.  इतर जिल्ह्यात ब्रेकदचेन नियम ( लाॅकडाऊन ) कमी करण्यात आले आहे. त्याच प्रकारचा न्याय पालघर जिल्ह्याला द्यावा. अशाप्रकारे लेखी विनंती श्री केदार काळे यांनी मा. मुख्यमंत्री साहेब, श्री राजेश टोपे आरोग्य मंत्री, श्री दादाजी भुसे पालघर जिल्हा पालक मंत्री यांना केलेली आहे. 
  पालघर ग्रामीण जिल्ह्यात मोठे सुसज्ज - रूग्णालय / सिव्हिल हॉस्पीटल नाही, म्हणून करोनाच्या तिसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पालघर जिल्ह्याला करोना नियम वलीच्या, तिसर्‍या स्तरावरील निर्बधात ठेवण्यात आले असल्याचे विश्वसनीय सूत्रा कडुन समजत आहे. तरीही कृपया सामान्य जनतेचा विचार करावा. एवढेच सांगणे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...