Tuesday, August 10, 2021

ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापनासाठी गोबरधन प्रकल्प उभारणी



*ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापनासाठी गोबरधन प्रकल्प उभारणी*


 पालघर (प्रतिनिधी)स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत पायाभूत सर्वेक्षणानुसार वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पुर्ण करून गाव हागणदारी मुक्त जाहीर करण्यात आली आहेत. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत केंद्र शासनाच्या सुचनाप्रमाणे राज्यात सहकार तत्वावर आधारीत घन कचरा व्यवस्थापन करीता गोबरधन प्रकल्प उभारणी करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यानी केले आहे.
            सन २०२१-२२ ते २०२४-२०२५ या कालावधीत राज्यात सहकार तत्वावर आधारित  पथदर्शी जिल्हा स्थरीय गोबरधन प्रकल्प, तालुका स्तरीय, ग्रामीण भागात क्लस्टर स्वरूपात व गाव स्तरावर वैयक्तिक स्तरीय गोबरधन प्रकल्प राबण्यात योणार आहेत.  प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजाणीसाठी  व अनुषंगिक अंदाजपत्रकीय प्रस्तावाच्या मान्यतेसाठी जिल्हास्तरीय तांत्रिक यंत्रणांना निवड करण्याकरीता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
       पालघर जिल्ह्यातील सन २०२१-२२करीता पशुधन असलेल्या गावांची निवड  येणार आहे. या प्रकल्पामध्ये   जनावरांचे शेण, स्वयंपाकघरातील उरलेला भाग, पिकांचे अवशेष, बाजारातील कचरा आणि मैलागाळ यासह मोठ्या प्रमाणात जैव-कचऱ्याचा उपयोग करून गावात स्वच्छता सुनिश्चित करणे. बायोगॅसमध्ये टाकून ऊर्जा निर्माण करणे आणि ग्रामस्थांचे जीवन सुधारणे. गोबरधन योजनेमुळे घनकचरा, विशेषत: गावांमधील जैव-कृषी कचरा सुरक्षित आणि प्रभावी व्यवस्थापनामध्ये लोकांशी संलग्न होणे अपेक्षित आहे जेणेकरून गावे स्वच्छ राहतील असा विश्वास  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...