Thursday, August 12, 2021

आझादी का अमृत महोत्सव ‘’ अभियाना अंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन



*‘’आझादी  का  अमृत महोत्सव ‘’ अभियाना अंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन* 


   पालघर (प्रतिनिधी) भारताच्या स्वांतत्र्य प्राप्तीस ७५ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून केंद्र शासनाच्या वतीने देशभरात  “आझादी का अमृत महोत्सव”  व नागरीकांची सनद उपक्रम राबविणेत येत आहे.   पालघर जिल्ह्यात हि  या निमित्ताने ग्राम पंचायत विभागा मार्फत  कायर्क्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.  आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत  अंमलबजावणीबाबत  केंद्र शासना  १५  ते  ५७  आठवडयाचा दिनांक   १६ /०७/२०२१ ते दिनांक १८/०८/२०२२  उपक्रम जाहिर केला आहे.    व  नागरीकाची सनद उपक्रमाअंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या
 "आझादी  का  अमृतमहोत्सव निर्देशानुसार दि. १३ ते १९ ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये आपल्या विषयासंबंधी मृद व जलसंधारण संबंधी शाश्वत विकासाच्या दृष्टी नियोजन करण्यात  आले  आहे. यासंदर्भात आज दि. १२/८/२०२१ रोजी मुख्य सचिव,महाराष्ट्र शासन यांनी व्हीसी द्वारे निर्देश दिले.
 शालेय विदयार्थ्यांमध्ये जाणीव जागृती होण्यासाठी स्वांतत्रदिनी जिल्हा व तालुका स्तरावरील माध्यमिक प्राथमिक शाळांमध्ये  प्रश्नमंजुषा, गायनस्पर्धा, चित्रकला, निबंध स्पर्धा, उत्कृष्ट पोस्टर बनविणे, मिनी, मॅरेथॉन इ.  स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार  आहे.
तसेचअंगणवाडी / मिनी अंगणवाडी बालवाडी माध्यमातून महिला मेळावे / किशोरी मिळावे घेणे यामध्ये स्थानिक ठिकाणच्या महत्त्वपूर्ण महिला स्वातंत्र्याशी निगडित स्थानिक महत्त्वाची प्रत्येक जिल्ह्यात स्वातंत्र्याशी निगडीत अज्ञात नायकांच्या जन्म स्थळी / कार्यस्थळी कार्यक्रम सादर करणे स्वातंत्र्याशी निगडीत अज्ञात नायक यांच्या विषयीची माहिती संकलित करणे, त्याचा फोटो उपलब्ध करून घेणे व त्या त्या जिल्ह्यांमध्ये शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी फोटोंचे पूजन करणे जिल्हानिहाय स्वातंत्र्याशी निगडीत महत्वाची ठिकाणे, स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित व्यक्तिमत्वे यांच्या कार्याची सचित्र पुस्तिका तयार करणे भारताच्या लोकाभिमुख योजनापैकी प्रत्येक विभागाने, कमीतकमी एका योजनेची, ठिकाणे याबाबतची माहिती देणे
कृषी संस्कृतीशी निगडित कृषी परंपरा, कृषी उत्सव याबाबतच्या नोंदी घ्याव्यात. असे निर्देश  मुख्य सचिव यांनी व्ही सी द्वारे दिले आहेत. 
या कालावधीत  प्रत्येक जिल्ह्यात उत्साहाचे व चैत्यनाचे वातावरण असावे अशा सूचना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या.
त्यानुसार  मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्याभरात आझादी अमृत महोत्सव अंतर्गत कार्यक्रम राबवण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांना सूचना दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...