*पालघर येथे स्वातंत्र्यदिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण*
पालघर(प्रतिनिधी) दि. 12 :- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त पालघर येथे रविवार दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9.05 वा. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, पार्श्वनाथ-9 बिल्डिंग, बिडको नाका, पालघर येथील प्रांगणात मा. ना. श्री. दादाजी भूसे, मंत्री, कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री पालघर जिल्हा यांच्या शुभ हस्ते होणार आहे.
दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8.35 ते 9.35 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकिय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. सदर शासकीय समारंभासाठी राष्ट्रिय पोषाख परिधान करावा. सुरक्षीतेच्या दृष्टिने कृपया कोणतीही बॅग/वस्तू सोबत आणू नये. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment