श्री केदार काळे - पालघर लोकसभा सहसमन्वयक, यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाज उपयोगी कार्यक्रम.
पालघर ( हिरालाल लोखंडे ) श्री केदार काळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ९ आॅगस्ट २०२१ रोजी,त्याचे चाहते हितचिंतक मित्र यांनी वेगवेगळ्या तिन ठिकाणी ,आपण ज्या समाजात वाढलो, राहतो त्या ठिकाणांची, राहणारी माणसे आपली आहेत. त्यांच्या साठी फुल नव्हे फुलाची पाकळी देणे आहे. हि भावना मनात ठेवत. कार्यक्रम आयोजित केले.
जागतिक महामारी कोव्हीड १९ या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावाने जनजीवन विस्कळीत झालेले असताना. या रोगाशी लढताना रक्तपुरवठा अपूर्ण पडत आहे. त्या अनुशंगाने हुमॅनिटी फाउंडेशन यांच्या सौजन्याने व डॉक्टर श्री राजेंद्र चव्हाण व श्रीमती वैशाली चव्हाण यांच्या स्टॉफच्या मदतीने, न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल पालघर. या ठिकाणी डॉक्टर उज्ज्वला काळे नगराध्यक्षा पालघर. विविध पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, उद्योजक यांच्या उपस्थित सहकारी वर्गाव्दारे रक्तदात्यांना प्रोत्साहित करून अनेक बाटल्या रक्त संकलीत करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळा वेवूर पालघर पुर्व. येथील इयत्ता ६ वी व ७ वीच्या मोजक्या विध्यार्थी यांना यांना बोलवून. करोना सुरक्षा नियमांचे पालन करीत. १९५ विद्यार्थी ( मोजक्या विद्यार्थी यांना बोलवून ) यांना श्री तुषार भानुशाली पालघर नगरपरिषद नियोजन सभापती श्री दिनेश घरत नगर सेवक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका यांच्या उपस्थित वाटप केले. राहिलेल्या विद्यार्थी यांना शिक्षक गण वाटप करणार आहेत.
आदिवासी शेतकरी बांधवांना कल्पवृक्ष प्रमाणे फायदेशीर ठरणारे नारळाचे झाड. व त्यापासून मिळणारे फायदे. गृहोपयोगी वस्तू बनविण्यासाठी झाडा पासुन मिळणारा कच्चा माल. त्यापासून अनेक गृहोपयोगी वस्तू बनवून विक्री केल्यानंतर मिळणारा आर्थिक लाभ. विचारात घेत. मोजक्या आदिवासी शेतकरी यांना बोलवून रोपे वाटप केली इतरांना घर पोच पाठवण्यात येतील. ( एकूण ५० पेक्षा जास्त शेतकर्यांना लाभ ) करोनाचे नियम पाळीत श्री केदार काळे यांनी सामाजिक कार्यकरीत आपला वाढदिवस आपले चाहते / मित्र / हितचिंतक /राजकारणी / उद्योगपती याच्या सानिध्यात केल्याने. सर्वत्र कौतुक होत असून चौहुदिशांनी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
No comments:
Post a Comment