Thursday, August 12, 2021

पालघर जिल्ह्याला कोविड १९ प्रतिबंधक लसीचा पुरेसा व नियमित साठा मिळावा, केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री भारती पवार यांना दिले निवेदन

पालघर जिल्ह्याला कोविड १९ प्रतिबंधक लसीचा पुरेसा व नियमित साठा मिळावा, 
 केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री भारती पवार यांना दिले निवेदन !
मा., खासदार श्री राजेंद्र गावित 

पालघर ( हिरालाल लोखंडे ) पालघर जिल्हा हा मुंबई - ठाणे - नाशिक सारख्या मोठ्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या जिल्ह्याना लागुन असलेला जिल्हा. असून सुध्दा इतर जिल्ह्याच्या तुलनेत पालघर जिल्ह्यात लसीकरण करण्याची सरासरी खुपच कमी आहे. 
     आरोग्य विभाग पालघर जिल्ह्याच्या ५ आॅगस्ट २०२१ च्या  आकडेवारी अनुसार, लसीकरणासाठी पात्र असलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात २३.५ टक्के नागरिकांना पहिला डोस लसीकरण व दुसरा डोस लसीकरण झालेल्या नागरिकांचे प्रमाण ८.१३ टक्के इतके असुन आता पर्यंत ९१.८७ टक्के नागरिकांचे लसीकरण होणे बाकी आहे. 
      कोवीड १९ च्या येणाऱ्या संभाव्य, तिसर्‍या लाटेवर अंकुश ठेवण्यासाठी, लवकरात लवकर नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. करोना महामारी रोग रोखण्यासाठी, लसीकरण हे एकमेव अस्र आपल्याकडे आहे.करोना निर्बंधांमुळे रोजगार, उद्योग - धंदे , व्यवसाय बंद असल्याने, जनतेची आर्थिक परिस्थिती तसेच सरकारी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी, सर्व सामान्य जनतेचे, कामगार वर्ग, व्यापारी, रोजंदारी धारक, विद्यार्थी यांचे लसीकरण लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.  जर ते झाले तरच आपण लाॅकडाऊन ते अनलाॅक पर्यंत जाऊ शकतो. असे मत मा. खासदार श्री राजेंद्र गावित यांनी मा. भारती पवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांना पालघर जिल्ह्यासाठी कोवीड १९ प्रतिबंधक लसीचा नियमित व पुरेसा साठा मिळण्यासाठी त्याच्या " स्वास्थ एवं परिवार कल्याण मंत्रालय दिल्ली. येथील कार्यालयात भेट घेऊन निवेदन देताना आपले मत व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...