नाशिक मुंबई हायवे वर पाडळी फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटून कार नाल्यात कोसळली :
सुदैवाने जीवितहानी टळली.
नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.
आज दि, 11/07/2021 रोजी सं.6.30 वाजे दरम्यान मुंबई नाशिक हायवे वर पाडळी फाटा येथे कार क्रमांक MH-15-FT-0061 या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, दरम्यान सदर कार एकदा पलटी होऊन रस्त्याचे खाली नाल्यात कोसळली असता अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली.
सुनीता सुनील काळभोर वय -47, रा.ओझर नाशिक ह्या मुंबई नाशिक हायवेने(चालक) मुलगा धीरज काळभोर सोबत ओझर कडे जात असताना हा अपघात झाला व त्यात व त्या गंभीर जखमी झाल्या व मुलगा धीरज किरकोळ जखमी झाला. घटनास्थळावरून त्यांना नाशिक कसारा हायवे पोलीस कैलास गोरे व सहकारी यांनी नरेंद्र महाराज अंबुलन्सने नाशिक सिव्हील हॉस्पिटल येथे रवाना केले व वाहतूक सुरळीतपणे चालु केली.
No comments:
Post a Comment