शासनाने प्रसिध्द केलेल्या सूचनांचे पालन करून बकरी ईद सण साजरा करावा !
स.पो.नि. संतोष जाधव
तारापूर (प्रतिनिधी)करोना रोगाच्या संसर्ग अजून संपलेला नसून येत्या बकरी ईद या सणांवर करोनाच्या तिस-या लाटेचे सावट असून येणारा बकरा ईद हा सण शासनाने प्रसिध्द केलेल्या सूचनांचे पालन करुन साजरा करावा;अशी सुचना पाचमार्ग तारापूर पोलिस स्टेशन चे स.पो.नि संतोष जाधव यांनी केली.
ते काल आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या कार्यक्रमात बोलत होते.मशिद मध्ये गर्दी न करता आपापल्या घरी नमाज पठण करावे,तसेच कूर्बानी करताना कोणतेही बेकायदेशीर कृत्य करू नये ज्यामूळे सार्वजनिक शांतता बिघडेल असे कृत्य करू नये असे आवाहान तारापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष जाधव यांनी केले
आगामी बकरा ईद, गूरुपौर्णीमा, आषाढी एकादशी सणांच्या अनुषंगाने तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील शांतता कमीटी, मोहल्ला समीती, प्रतिष्ठीत नागरिक, पोलीस मित्र, पोलीस पाटील , मूस्लिम जमातचे ट्रष्टी यांची बैठक पोलीस ठाण्यात घेण्यात आली.बकरा ईद सणांचे ग्रुह विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना समजावून सांगितल्या .वरील सण एकत्रित न येता साधेपणाने घरीच साजरा करावा, करोना नियमांचे पालन करावे तसेच सण शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यास प्रशासनास सहकार्य करावे या बाबत सूचना देण्यात आल्या . सदर सभेत तारापूरचे उपसरपंच तसेच मूस्लीम जमात चे अध्यक्ष वसिम पूनावाला,पास्थळचे उपसरपंच गोपी घरत, प्रा.संजय घरत, कल्पेश पाटील (पोलीस पाटील कूडण) शाहजहान गवंडी,ईन्तेखाब पूनावाला, सलीम गवंडी,शब्बीर दमणवाला, सलीम शेख,अब्दूल्ला सोपारकर,नासरूद्दी शेख,नासिर कौलारिकर, शहबाज शेख मोहीद्दीन बाबा सह अनेक मान्यवर उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment