Thursday, July 1, 2021

अनुवांशिक सुधारणा कार्यक्रमासाठी २२ जुलै पर्यंत अर्ज करावे.

*अनुवांशिक सुधारणा कार्यक्रमासाठी २२ जुलै पर्यंत अर्ज करावे.*

पालघर(प्रतिनिधी) दि. ०१ : राज्यातील गायी व म्हशी मधील उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीकोनातून पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत सर्व समावेशक अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम दर वर्षी राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत गायी म्हशींच्या उत्पादन क्षमतेत पिढी गणिक सुधारणा घडवून आणणे व प्रत्येक पिढीतील उच्च उत्पादन क्षमता असलेल्या जनावरांची निवड करून फक्त त्यांचेच द्वारे पुढील पिढीतील दर्जेदार वासरे निर्माण करणे हा या योजने मागचा मूळ उद्देश आहे. त्यानुसार या कार्यक्रमांतर्गत गायी व म्हशींची निवड करण्यात येणार असून त्यांना उच्च क्षमतेच्या वीर्य मात्रा द्वारे कृत्रिम रेतन करण्यात येणार आहे. राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी गायी म्हशींच्या विशिष्ट जातीच्या संवर्धनासाठी ब्रीडर्स असोसीयेशन, शेतकर्यांचे समूह गट, स्वयं सहाय्यता गट इ स्थापन केले असतील त्या त्या ठिकाणी या माध्यमातून सदर योजनेस प्रसिद्धी देण्याबाबत चे निर्देश आहेत. योजनेचे अर्ज प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थे मध्ये उपलब्ध आहेत. अर्ज स्वीकृत करण्याची अंतिम तारीख हि २२-०७-२०२१ असून जिल्ह्यातील सर्व पशुपालक व शेतकरी बांधव यांनी सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पालघर डॉ. प्रशांत ध. कांबळे यांनी केले आहे. योजनेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...