*प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा*
पालघर (प्रतिनिधी)दि. ०१ : शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2021 व रब्बी हंगाम 2020-21 पासून तीन वर्षासाठी जिल्हयात राबविण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत जिल्हयातील भात, नागली व उडीद या पिकांचा समावेश आहे. खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रक्कम भातासाठी हेक्टरी रक्कम रुपये 45,500/-, नाचणीसाठी हेक्टरी रक्कम रुपये 20,000/- आणि उडदासाठी हेक्टरी रक्कम रुपये 20,000/ इतकी आहे असून शेतकऱ्यांनी 2 टक्के विमा हप्ता म्हणजेच भातासाठी 910/- रुपये प्रति हेक्टर, नाचणीसाठी 2 टक्के 400 /- रुपये प्रति हेक्टर व उडीद करीता 400/- रक्कम प्रति हेक्टर आहे. सदर योजना कर्जदार व बिगरकर्जदार शेतक-यांना ऐच्छिक असून खरीप 2021 मध्ये योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 15 जूलै 2021 आहे. कर्जदार शेतकरी यांनी योजनेत सहभागी न होण्याची व विमाहप्ता कर्ज रकमेत वजावट न करण्याची सुचना बँकेला देण्याची अंतिम मुदत नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी पर्यंत आहे.
● *योजनेची उद्दीष्टे*
1. नैसर्गिक आपत्ती, किड आ रोगासारख्या अकल्पिक प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास
2. पिक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थीतीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.
3. शेतकऱ्यांच्या नाविन्यपर्ण व सधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
● *खरीप हंगामातील जोखीमीच्या बाबी* :-
1. हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थीतीमुळे पिकांची पेरणी हिंवा लावणी झाल्यामुळे होणारे नुकसान
2. पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थीतीमुळे पिकांची पेरणी हिंवा लावणी झाल्यामुळे होणारे नुकसान
3. पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इ. बाबीमुळे उत्पन्नात होणारी घट.
● सदर योजना अधिसुचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसुचित पिकांसाठी आहे.
● शेतकऱ्याने भरावयाच्या खरीप हंगामतील विमा हप्ता दर खालील प्रमाणे विमा संरक्षित रकमेच्या 2 टक्के मर्यादीत ठेवण्यात आला आहे.
● या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2021 करिता जोखिमस्तर सर्व अधिसुचित पिकांसाठी 70 टक्के असा निश्चीत करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. त्याकरीता तात्काळ नजीकच्या तालुका कृषि अधिकारी, कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर श्री. काशिनाथ तरकसे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment