पालघर येथे वसंतराव नाईक यांची जंयती साजरी
पालघर (प्रतिनिधी)दि.1 :- 1 जुलै 2021 रोजी वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय पालघर येथे हरितक्रांतीचे प्रणेते तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. वसंतराव नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी पुसद या गावी, यवतमाळ जिल्हामध्ये झाला. वसंतराव नाईक हे मराठी राजकारणी होते. दि. 5, डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 या कालखंडा दरम्यान ते महाराष्ट्र राज्याचे 12 वर्ष मुख्यमंत्री होते. वसंतराव नाईक हे महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री व एक कृषितज्ञ होते. त्यानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ राज्यभार सांभाळला. वसंतराव नाईक हे यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद या गावाजवळील गहुली या छोट्याश्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबातील होते. त्यांनी सर्वात पहिले पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद भूषविले होते. ते महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय नेते होते. हरित क्रांतीचे प्रणेते अशी त्यांची ओळख होती.
याआयोजित कार्यक्रमात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले रवी भगवान राठोड प्रदेश समन्वयक राष्ट्रीय बंजारा टायगर्स, बळीराम चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रीय बंजारा टायगर्स, राम चव्हाण जिल्हा सचिव, राहुल राठोड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा युवा टायगर्स, प्रदीप राठोड विनोद चव्हाण, विठ्ठल राठोड,अजय राठोड, संदीप राठोड, माजी सैनिक भाऊरावजी तायडे,समाज कल्याण अधिकारी हर्षा सर, जिल्हा समनव्ययक रमेश राठोड, जातपडताळणी कार्यालयाचे प्रकाश तायडे, महिला बाल विकास अधिकारी व कर्मचारी,उपस्थित होते यासर्व मान्यवरांनी व अधिकारी- कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाच्या सौ. ज्योती अनिल कांबळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा व्यवस्थापक श्री किशोर वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली केले. शेवटी सौ.ज्योती अनिल कांबळे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.
.
No comments:
Post a Comment