Sunday, July 11, 2021

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभागाच्या वतीने पत्रकारांना विविध साहित्याचे वाटप मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न!

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभागाच्या वतीने पत्रकारांना  विविध साहित्याचे वाटप मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न!

खरी बातमी देताना सुद्धा पत्रकारांना जोखीम पत्करावी लागते...अधिक पाटील
भिवंडी दि.११(प्रतिनिधी) वार्तांकन करीत असताना खरी बातमी देताना सुद्धा पत्रकारांना खूप मोठी जोखीम पत्करावी लागत असते आणि ते आपला जीव धोक्यात घालून काम करीत असतात त्याचबरोबर कोरोनाच्या या वातावरणात किशोर पाटील आणि पत्रकार संघाने मास्क,सॅनिटायझर,रेनकोट,डायरी,पेन,शर्टपिस ,याचे वाटप करून अजून कोरोना संपला नाही हा संदेश दिला आहे त्यामुळे पत्रकारांनी आपली काळजी घेऊन वार्तांकन करावे असे भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या भिवंडीतील कैलास नगर वळपाडा गावातील दैनिक स्वराज्य तोरण कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलत होते.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभाग सरचिटणीस आणि दैनिक स्वराज तोरणचे संपादक किशोर बळीराम पाटील यांच्या वतीने व भोकरी गावचे समाजसेवक श्री.रामचंद्र शांताराम देसले,भाजपा ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्री.श्रीधर जयवंत पाटील व समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री.सोन्या काशिनाथ पाटील यांच्या सौजन्याने भिवंडी तालुक्यातील पत्रकारांना वार्तांकन करीत असताना लागणाऱ्या आवश्यक अश्या पावसाळी रेनकोट,मास्क,सॅनिटायझर,डायरी,पेन,कार्ड रिबीन, आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले.या पत्रकार संघाने कोरोना सुरू झाल्यापासून संपूर्ण जिल्ह्यातील मुक्त पत्रकारांना कित्येक महिन्यांचे धान्य,औषधे,मास्क आदी वस्तूंचे वाटप करून मोलाची मदत केली आहे.आणि आता सुद्धा सुमारे पन्नासहुन अधिक पत्रकारांना पावसाळी रेनकोट आणि ईतर वस्तूंचे वाटप करण्यात आले.यावेळी आर.एस.पी कडून जेष्ठ पत्रकारांना कोरोना काळात उत्तम काम केल्याबद्दल कोरोना काळातील देवदूत म्हणून  प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.सदर कार्यक्रमात कोकण विभाग अध्यक्ष नितीन शिंदे,नवी मुंबई  जिल्हा अध्यक्ष श्री. कुंडलिक कानगुडे, मनिलाल शिंपी कल्याण आरएसपी अधिकारी: आर एस पी अधिकारी युनिट कमांडर  ठाणे जिल्हा / महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा पथक कमांडर ,मिलिंद दाभोळकर  - सचिव
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ  (ठाणे शहर ) जिल्हा
प्रमोद घोलप  -सह सचिव महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ
(ठाणे शहर ) जिल्हा  
देवेंद्र शिंदे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ प्रसिद्धीप्रमुख, डॉ.नितीन पाटील,भिवंडी वार्ताहर संघाचे अध्यक्ष राजेंद्र काबाडी, माजी सरपंच श्री.संजय पाटील,संतोष चव्हाण, सुराजपाल यादव,सुरेंद्र तिवारी,अरुण मिश्रा,लवलेश सुतार,अशोक गुप्ता, ताज अन्सारी, आदी मान्यवर  व भिवंडी ग्रामीण व शहरातील पत्रकार उपस्थित होते.
यावेळी कोकण विभागीय अध्यक्ष श्री नितीन शिंदे,,नवी मुंबई  जिल्हा अध्यक्ष श्री. कुंडलिक कानगुडे,आरएसपी कमांडर मणीलाल शिंपी,ज्येष्ट पत्रकार राजेंद्र काबाडी,आचार्य सूरजपाल यादव, संतोष चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राजेंद्र पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन आयोजक श्री.किशोर पाटील यांनी केले...

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...