Friday, July 2, 2021

कृषी दिना निमित्त मु.का.अ.यांनी केली भात लागवड


 *कृषी दिना निमित्त मु.का.अ.यांनी केली भात लागवड*


पालघर (प्रतिनिधी)कृषी दिनानिमित्त दि.१/७/२०२१ रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, प्रकल्प संचालक माणिक दिवे यांनी कृषी  पालघर तालुक्यातील अंबान या गावातील उमेद' अंतर्गत स्थापन केलेल्या'एकता' ग्रामसंघाची भेट घेऊन   ग्रामसंघाच्या परसबाग व SRI (एक काडी भात लागवड) उपक्रमाला भेट देऊन प्रत्यक्ष भात लागवड केली. 

  या प्रसंगी उमेद च्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांनी SRI चे प्लॉट तयार करून भाताचे पीक घ्यावे तसेच परसबागेत वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला पिकवून महिलांना रोजगार कसा उत्पन्न होईल यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन मु.का.अ.यांनी केले. 
 दशपर्णी अर्क आणि शेणखत याचा वापर करून परसबागेतील भाजीपाला जास्तीत जास्त कसा उत्पादित करता येईल यासाठी महिलांनी प्रयत्न करावेत त्यासाठी जिल्हा परिषदे मार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी प्रकल्प संचालक माणिक दिवे यांनी गटाच्या महिलांना दिली.
 या प्रसंगीजिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षातील DM-IBCB  ,  पालघर पंचायत समिती चे मा. सभापती मा. गट विकास अधिकारी , उमेद चे पालघर तालुकास्तरीय  सर्व अधिकारी /कर्मचारी , Cader , ग्रामसंघातील सर्व सदस्य ,  ग्रा.प .चे ग्रामसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते .

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...