Friday, July 2, 2021

बंद सदनिकेत आग ! शिवम कॉम्प्लेक्स सफाळे पुर्व

बंद सदनिकेत आग !
    शिवम कॉम्प्लेक्स सफाळे पुर्व 
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) सफाळे पुर्व येथील शिवम कॉम्प्लेक्स मधे श्री जयवंत भोईर राहणार दहिसर तर्फे मनोर ता.जि.पालघर यांच्या मालकीची असलेली सदनिका काही दिवसापासून बंद होती. परंतु सदनिकेत असलेला फ्रिज चालु असल्या कारणाने, फ्रिजच्या काॅम्प्रेसरचा दिनांक २ जुलै २०२१ रोजी दुपारी सुमारे एक ते एक तिसच्या दरम्यान, अचानक पणे बंद सदनिकेत स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली.सदर आगीत सदनिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने आगी मुळे कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. 
     आगीची माहीती मिळताच, आग आटोक्यात आणण्यासाठी सफाळे सर्प मित्र प्रशांत मानकर ( पिंट्या ) मिकेश शेट्टी, अजिंक्य घरत, परेश पाटील, सफाळे -  
उंबरपाडा ग्रामपंचायत उपसरपंच श्री राजेश म्हात्रे ( बंटी दादा ) सफाळे ग्रामपंचायत कर्मचारी समीर म्हात्रे, प्रफुल घरत, ग्रामस्थ बांधव यांनी क्षणाचाही विलंब न करता. मोठ्या शिफायतीने व शिस्तबद्ध रित्या, अग्निशमन यंत्रा व्दारा, आगीवर नियंत्रण मिळवून मोठ्याप्रमाणावर होणारा धोका टाळला. 
   सफाळे सर्प मित्र हे नेहमीच सामाजिक कार्य, आपत्ती व्यवस्थापन कार्य, किंवा कोणताही प्रसंग असो अश्या वेळे  ते स्वतः हुन घटना स्थळी धावत जाऊन मोलाचे सहकार्य करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो. त्यांच्या कार्याचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. 
       सदर घटना स्थळास सफाळे पोलीस ठाणे येथील प्रभारी अधिकारी आणी कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी केली.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...