माहे जूलै ते सप्टेंबर 2021 साठी अंत्योदय अन्न योजनेतील
शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका 1 किलो साखर उपलब्ध
पालघर(प्रतिनिधी) दि. 02 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी एन.सी.डी.इ.एक्स स्पॉट एक्सचेंज लिमिटेड मार्फत अत्यंत आधुनिक व पारदर्शक पद्धतीने लाईव्ह ऑक्शनच्या माध्यमातून त्यांचेकडील नोंदणीकृत M/s ETC Agro Processing (India) Pvt Ltd Mumbai यांच्याकडून पालघर जिल्ह्यातील अंत्योदय लाभार्थ्यांसाठी माहे जूलै, 2021 ते सप्टेंबर, 2021 या तिमाहीसाठी 3069 क्विंटल S-30 दर्जाची साखर प्राप्त होणार आहे. पालघर जिल्ह्यातील तालुकानिहाय गोदामांपर्यंत साखर पोहोचविणेसाठी संबंधितास कळविलेले आहे. सदर साखर सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका 1 किलो प्रमाणे 20 रुपये प्रति किलो या दराने 100% उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment