Monday, June 7, 2021

पिकविमा कंपनीकडुन त्वरीत भरपाई मिळावी या करीता इगतपुरी तालुक्यातुन राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस पक्षासह सर्व पक्षीयांच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन.

पिकविमा कंपनीकडुन त्वरीत भरपाई मिळावी या करीता इगतपुरी तालुक्यातुन राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस पक्षासह सर्व पक्षीयांच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन.

नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

मागीलवर्षी इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची शेतपिकाची मोठया प्रमाणात नुकसान झाली. तालुक्याचे मुख्य भात पिकांचे मोठ़या प्रमाणात झालेल्या नुकसानीचे सबंधित अधिकारी व तलाठी मार्फत पंचनामे केले,मात्र पिकविमा कंपनीने बहुतांशी शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान होऊनही त्यांना पिकविमा कंपनीकडुन नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कोविड महामारीने त्रस्त व हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सबंधित अधिकारी स्तरावर पिकविमा कंपनीकडुन त्वरीत भरपाई मिळावी या करीता तालुक्यातुन राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षासह सर्व पक्षीयांच्या वतीने माजी आमदार शिवराम झोले यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास सर्वपक्षीयांच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसु असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी माजी आमदार शिवराम झोले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब गाढवे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, माजी पंचायत समिती उप सभापति पांडुरंग वारूंगसे, समता परिषद तालुकाध्यक्ष शिवा काळे, तानाजी आव्हाड, विष्णु राव, पांडुरंग कोकणे, दिपक गायकवाड, सोमनाथ आव्हाड, विष्णु पोरजे, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे, शहर अध्यक्ष वसीम सैयद, गोटीराम शेलार, दत्तु कापसे, तुकाराम वारघडे, बाळासाहेब धुमाळ, योगेश शेलार, भास्कर पोरजे, माजी प. स . सभापती विष्णु चव्हाण यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकारी सदस्य उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...